Special Report Opposition : विरोधी पक्षनेतेपदाचं 'वेटिंग', देवेंद्र फडणीसांकडे 'सेटिंग'?
Special Report Opposition : विरोधी पक्षनेतेपदाचं 'वेटिंग', देवेंद्र फडणीसांकडे 'सेटिंग'?
देवेंद्र फडणीस यांच्या सोबत आपली दुष्मनी नव्हती तर विरोधी पक्षाची भूमिका म्हणून विरोध होता. मात्र, व्यक्तिगतरित्या आपले त्यांच्या सोबत संबंध चांगले असल्याची प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणीस सरकार सोबत दिलजमाई करण्याचे संकेत दिले आहेत. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर पहिल्यांदा एकनाथ खडसे यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केलीये. महायुती सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणले ल्या लाडकी बहिण सारख्या योजनांचा परिणाम म्हणून महायुतीला अपेक्षा पेक्षा जास्त मते मिळाली असल्याचंही खडसे यांनी म्हटलं आहे. ईव्हिएमबाबत आपला विरोध नाही,मात्र अनेक निकाल हे ईव्हीएम बाबत संशय निर्माण करणारे राहिले आहेत. ते दूर व्हायला पाहिजे असंही खडसे यांनी सांगितलं.