special report Devendra Fadnavis Jacket:शपथ, पत्रकार परिषदा,मुख्यमंत्र्यांच्या गुलाबी जॅकेटची चर्चा
special report Devendra Fadnavis Jacket:शपथ, पत्रकार परिषदा,मुख्यमंत्र्यांच्या गुलाबी जॅकेटची चर्चा
प्रचारात गुलाबी जॅकेट... शपथविधीला गुलाबी जॅकेट... पत्रकार परिषद आणि सभांनाही गुलाबी जॅकेट.... आधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही गुलाबी जॅकेटमध्ये दिसू लागले आणि एकच चर्चा रंगली... होय... मुख्यमंत्री म्हणतायत ते खरंच असेल म्हणा कारण दादांनी विधानसभेच्या आधी चढवलेलं गुलाबी जॅकेट थेट निकालानंतरच उतरवलं... पण फडणवीसांनी मात्र या गुलाबी जॅकेटची आता सवय करुन घेतली आहे... दोन दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हाही त्यांच्या अंगावर गुलाबीच जॅकेट..जॅकेटच्या या गुलाबी रंगावरुन विरोधकांनीही अनेक वेळा दादा आणि फडणवीसांना टोला लगावला.... पण अजितदादांनी भर विधानसभेत यावर प्रत्युत्तर दिलंच... महायुती सत्तेत आली... फडणवीस मुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री बनले... पण दादांनी ज्या गुलाबी जॅकेटचा ट्रेंड सुरु केला तो पुढे कॅरी करण्याचं काम फडणवीस करतायत... तेव्हा ही जॅकेटची गुलाबी स्टोरी आता महाराष्ट्राच्या राजकारणात किती दिवस पाहायला मिळते... ते पाहणं महत्वाचं ठरेल...