ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 15 April 2025
ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 15 April 2025
चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांचा वाद मातोश्री दरबारी, दानवेंकडून रात्री तर चंद्रकांत खैरेंकडून आज उद्धव ठाकरेंची भेट, वादावर तोडगा निघणार का याची उत्सुकता
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा महिनाअखेरीस सुटेल, मंत्री भरत गोगावले यांची स्पष्टोक्ती, आज एकनाथ शिंदेंची भेट घेणार असल्याचीही माहिती
सिंधुदुर्गातील २०२३च्या प्रकाश बिडवलकर हत्याप्रकरणी चार आरोपींना अटक, बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था भयानक, माजी आमदार वैभव नाईकांची टीका, ९ शिवसैनिकांची हत्या झाल्याचा राऊतांचा आरोप
धनंजय मुंडेंना कराड नकोच होता, तो मुंडेंची सर्व गुपितं बाहेर काढणार होता, निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेचा नवा दावा
मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून २०१६ ते २०२४ दरम्यान १०० हून अधिक शिक्षकांची भरती, नागपूरच्या बोगस शिक्षक घोटाळ्यात धक्कादायक आरोप
जालन्यात अतिवृष्टी, गारपिटीच्या अनुदानावर महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा डल्ला, बोगस शेतकऱ्यांच्या नावे कोट्यवधींचं अनुदान हडपलं...जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीत धक्कादायक प्रकार उघड
एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, उर्वरित ४४ टक्के पगार आज मिळणार, एबीपी माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज





















