एक्स्प्लोर

Pune Crime: पतीची अमानवी विकृती, पत्नीने पोटगी मागितली म्हणून गुप्तांगात हळद-कुंकू भरलं, लिंबू पिळलं

Pune crime news: पिंपरी-चिंचवड हादरलं! बायकोने पोटगी मागितल्याने नवऱ्याचं अमानवी कृत्य, जबरदस्तीने शरीरसंबंध, गुप्तांगात हळद-कुंकू भरुन.... या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Pimpri Chinchwad crime news: संसारात विघ्न आलं की मग पती-पत्नी घटस्फोटासाठी न्यायालयाचे दार ठोठावतात. ही बाब काय नवीन नाही. सध्या पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या दाम्पत्यामध्ये वीस वर्षांच्या संसारात वादाची ठिणगी पडली. यातून पत्नीनं न्यायालयात धाव घेत, पोटगीची मागणी केली. या रागातून पतीने अमानवी विकृतीचा कळस गाठला. पत्नी मुलांची कागदपत्रे घेण्यासाठी घरी आली. तेव्हा इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले अन गुप्तांगात हळदी-कुंकू भरत त्यात लिंबू पिळले. असा धक्कादायक आरोप पत्नीने केलाय. यामुळं शहरातच नव्हे राज्यभर खळबळ उडालेली आहे. घटना वर्षभपूर्वीची असून याप्रकरणी पीडित पत्नीनं सांगवी पोलीस स्टेशनमध्ये नुकताच गुन्हा दाखल केलाय. हा संतापजनक प्रकार पिंपळेनिलखच्या विशालनगर मध्ये घडलाय. (Pune Crime news)

आरोपी पती आणि पीडित पत्नीचा विवाह 2004 मध्ये  झाल. या दाम्पत्याला तीन मुले ही आहेत. दरम्यानच्या काळात पती-पत्नींमध्ये कौटुंबिक वादाला तोंड फुटलं होतं. अनेकदा हे वाद विकोपाला गेले अन काही काळात ते मिटले. मात्र, 2023 मध्ये झालेल्या खडाजंगीत हे दोघे विभक्त झाले. पीडित महिला आपल्या दोन्ही मुलांना घेऊन स्वतंत्र राहू लागल्या. त्यानंतर आरोपी पती हा पिंपळे निलख परिसरात दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेला. मग पत्नीनं घटस्फोट आणि पोटगीसाठी न्यायालयात धाव घेतली. यामुळं पती चांगलाच संतापला. अशातच जून 2024मध्ये मुलांची कागदपत्रे अन शाळोपयोगी वस्तू घेण्यासाठी पत्नी पतीच्या घरी गेली. तेव्हा पती दारूच्या नशेत होता. त्यावेळी ही पतीने पोटगी मागितली यावरून वाद घालायला सुरुवात केली अन अश्लील शिवीगाळ सुरु केली. 

पत्नीनं त्याकडे दुर्लक्ष केलं अन अबोला ठेवला. मग पतीने धारदार शस्त्र दाखवून इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध निर्माण केले. तसेच गुप्तांगात हळदी-कुंकू भरून, त्यात लिंबू पिळले. आता मी तुझ्यावर जादूटोणा केलाय, आता तू वेडी होणार आहेस. पण मी तुझ्यासोबत जे काही केलं, याबद्दल कोणाला काही सांगितलं तर जीवे मारुन टाकेन. अशी धमकी ही दिली. असे पत्नीने फिर्यादीत आरोप केलेत. त्या अनुषंगाने सांगवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. जून 2024मध्ये नेमकं काय-काय घडलं, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

गळ्यावर कोयता ठेवून धमकावलं अन् कपडे काढायला लावले

पत्नी आपल्या नवऱ्याच्या फ्लॅटमध्ये गेली तेव्हा महिलेची आई, मामी आणि मुलं सोसायटीच्या पार्किंगमध्ये थांबली होती. पत्नी घरात आल्यानंतर नवऱ्याने शिवीगाळ सुरु केली. मात्र, पत्नीने त्याकडे लक्ष दिले नाही. यावर पती आणखी संतापला. 'मी बोलतोय, तरी माझ्याकडे बघत नाही', असे म्हणत नवऱ्याने कोयता काढून बायकोच्या गळ्यावर ठेवला. त्यानंतर नवऱ्याने पत्नीला जबरदस्तीने कपडे काढायला सांगितले. त्यानंतर पत्नीच्या इच्छेविरोधात तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर घरातील हळद-कुंकू लावलेल्या लिंबाच्या चार फोडी आणल्या. या लिंबाच्या फोडी त्याने पत्नीच्या गुप्तांगात पिळल्या. आता मी तुझ्यावर जादूटोणा केलाय, आता तू वेडी होणार आहेस, असे त्याने म्हटले. या सगळ्या प्रकारानंतर पत्नी आणि तिचे कुटुंबीय घाबरले होते. अखेर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते दीपक कांबळे यांना हा प्रकार सांगण्यात आला. कांबळे यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर दीपक कांबळे पीडित महिलेला घेऊन सांगवी पोलीस ठाण्यात गेले आणि फिर्याद नोंदवली. 

आणखी वाचा

आईचे प्रेमप्रकरण लेकीने उघडं पाडलं, वैरीण आईने लेकीचेच नको ते व्हिडिओ काढून स्वतःच्या बॉयफ्रेंडला पाठवले, पुणे हादरले !

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Embed widget