एक्स्प्लोर
Kirit somaiya बीडमध्ये भाजपच्या किरीट सोमय्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; मुस्लीम नागरिकांनी दाखवले काळे झेंडे
Kirit somaiya: विरोधी पक्षातील नेत्यांचे वेगवेगळे घोटाळे बाहेर काढत त्यांच्यावर आरोप करणारे भाजप नेत किरीट सोमय्या संध्या बांगलादेशी नागरिकांच्या भारतातील निवासाबद्दल सक्रीय झाले आहेत.
Kirit sommaiya host black flag
1/7

विरोधी पक्षातील नेत्यांचे वेगवेगळे घोटाळे बाहेर काढत त्यांच्यावर आरोप करणारे भाजप नेत किरीट सोमय्या संध्या बांगलादेशी नागरिकांच्या भारतातील निवासाबद्दल सक्रीय झाले आहेत.
2/7

भाजप नेते किरीट सोमैय्या त्याच अनुषंगाने आज बीड जिल्हा दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांच्या ताफ्याला मुस्लिम नागरिकांनी काळे झेंडे दाखवले आहेत.
3/7

भाजपा नेते किरीट सोमय्या हे परळी शहरात आले होते. तब्बल दोन तास त्यांनी पोलीस ठाण्यात बांगलादेशी नागरिकांना बोगस जन्म दाखला देणाऱ्या संबंधित सर्वावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
4/7

परळीतून ते परत जात असताना मुस्लिम समाजाने थेट सोमैय्या यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले.
5/7

परळी शहरातील मुख्य रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक व एक मिनार चौकात घोषणाबाजी करत काही मुस्लिम नागरिकांनी हातात काळे झेंडे दाखवत ही घोषणाबाजी केलीय.
6/7

दरम्यान पोलीस प्रशासनाने ही परिस्थिती हाताळत त्यांचा ताफा सहीसलामत या मार्गावरुन काढून दिला.
7/7

किरीट सोमय्यांच्या ताफ्याला पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतो, तरीही नागरिकांना आपल्या संतप्त भावना व्यक्त करत सोमय्या यांच्या ताफ्यासमोर काळ झेंडे फडकावले
Published at : 15 Apr 2025 02:57 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
यवतमाळ
























