IPL 2025 KKR vs PBKS: ठुकराके मेरा प्यार....गाणे कोण गाणार, श्रेयस की शाहरुख?

आज चंदीगड च्या मैदानात किंग खान ची कलकत्ता विरुद्ध श्रेयस ची पंजाब हा सामना रंगेल..गेल्या वर्षीचा आय पी. एल विजेता कर्णधार श्रेयस त्याच्याच कलकत्ता संघा बरोबर लढेल... आय पी एल विजेत्या संघाच्या कर्णधाराने पुढील वर्षी संघ सोडणे ही घटना बहुधा पहिल्यांदाच घडली असावी....ज्या गौतम गंभीर च्या हातात संघ देताना किंग खान म्हणाला होता की "तुझी टीम आहे ... हिला तू बनवू शकतोस किंवा मोडू शकतोस...सगळे तुझ्या हातात आहे"...इतके स्वातंत्र्य देणारा संघ मालक श्रेयस च्या बाबतीत असा का वागला? की काही गणिते ही पैशाची होती...की काही गणिते मानापमान ची ...की काही श्रेय वादाची...ही गोष्ट क्रिकेट रसिकांना समजली नाही...अर्थात तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे...आपण किती जरी म्हणालो की हे खेळाडू पक्के व्यावसायिक असतात तरी सुद्धा कधी कधी हा खेळ भावनांचा होतो...आणि आपण तर पक्के भारतीय...
कलकत्ता संघाने २०२४ चे विजेतेपद पटकावल्यावर श्रेयस अय्यर ला त्याचे हवे तेवढे श्रेय मिळाले नाही असे काही ठिकाणी म्हटले गेले...मग हे श्रेय गेले कुणाकडे तर गौतम गंभीर कडे....आणि चंद्रकांत पंडित यांच्याकडे....आता गौतम गंभीर हे भारतीय संघाचे प्रशिक्षक आहेत...तर चंद्रकांत पंडित आज ही कलकत्ता संघा सोबत आहेत....श्रेयस गेल्यावर त्यांनी कर्णधार म्हणून आग्रह धरला तो अजिंक्य रहाणे याचा...आता ही लढत मुंबई संघातील दिग्गज लोकांमध्येच होणार....
श्रेयस ने पंजाब संघाची कमानं सांभाळल्या नंतर पंजाब संघाने कात टाकली.. आतापर्यंत इतिहासात दुबळा वाटणारा संघ स्पर्धेत सगळ्यात बलवान वाटू लागला...श्रेयस अय्यर ने त्या संघाची देह बोली बदलून टाकली...लीड फ्रॉम द फ्रंट ही गोष्ट त्याने स्वतःच्या बाबतीत सुरू केली.
गुजरात सोबत ९७ धावांची वादळी खेळी २३० च्या स्ट्राईक रेटने...५२ धावा लखनौच्या विरुद्ध १७३ च्या स्ट्राइक रेटने...८२ धावा हैदराबाद संघासोबत २२७ च्या स्ट्राइक रेटने ..अशा काही खेळ्या त्याने करून या वेळेस पंजाब संघ काय करण्याच्या तयारीत आहे याचे स्टेटमेंट दिले आहे...तो जेव्हा मैदानात येतो तेव्हा त्याची देहबोली विव रिचर्ड्स ची आठवण करून देते...इतका आत्मविश्वास त्याच्यामध्ये असतो..त्याला प्रियांश आणि प्रभ सिमरन यांची साथ आहे..
दुसरीकडे कलकत्ता संघ ६ सामन्यामध्ये ६ गुण घेऊन गुणतालिकेत ५ व्या स्थानावर आहे...यामध्ये कलकत्ता संघ मिश्र कामगिरी करीत आहे...त्यांच्याकडे सुनील नारायण नावाचा एक स्थितप्रज्ञ खेळाडू आहे जो त्या संघाला एक्स फॅक्टर मिळवून देतो....क्रिकेटच्या मूल्यांवर विश्वास असणारा त्यांचा कर्णधार अजिंक्य रहाणे आहे...प्रशिक्षक म्हणून काम करीत असताना क्रिकेट मधील बेसिक वर आणि शिस्तीवर भर देणारे चंद्रकांत पंडित त्यांचे प्रशिक्षक आहेत...आणि कोडे न उलगडणारी गोलंदाजी करणारा वरूण आहे...ही लढत दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्वाची आहे...कारण स्पर्धा मध्यावर आली आहे...दोन्ही संघासाठी हा भावनांचा खेळ आहे...कारण पंजाब आणि बंगाल ही दोन्ही राज्य जीवन जगताना भावनांना प्राधान्य देतात....विजय कोणाच ही झाला तरी ठुकरा के मेरा प्यार ..हे गाणे मनातील मनात गायले जाईल...प्रश्न हा आहे..की गाणे गाणारा गायक शाहरुख आहे की श्रेयस...
























