एक्स्प्लोर
सोलापुरात ST महामंडळाची बस जळून खाक; चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे सर्व प्रवासी सुखरुप
Solapur bus fire
1/8

सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी येथे एसटी महामंडळाच्या लालपरी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली.
2/8

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावाजवळ ही घटना घडली असून या दुर्घटनेत बस जळून खाक झाली आहे.
3/8

अक्कलकोटहून कुर्डुवाडीच्या दिशेने ही बस जात असताना बसमध्ये अचानक बिघाड झाल्याने तिने पेट घेतला.
4/8

गाडीच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे लक्षात आल्यावर वाहन चालकाने बस रस्त्याच्या बाजूला उभी केली
5/8

बसचालकाने बस रस्त्याच्या बाजुला उभी केल्यानंतर बसमध्ये असलेल्या प्रवाशांना खाली उतरवण्यात आले.
6/8

सुदैवाने या बस दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नसून आगीवर नियंत्रण मिळवण्यात उशिरा यश आले. तोपर्यंत बस जळून खाक झाली.
7/8

दरम्यान, स्थानिक नागरिकांकडूनही बस विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले होते, तसेच स्थानिकांनी प्रवाशांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.
8/8

भररस्त्यावर बस जळत असल्याने काही काळ वाहतुकीसाठी अडचण निर्माण झाली होती.
Published at : 14 Apr 2025 09:49 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















