Beed Tomato : 200 किलो टोमॅटोचा लाल चिखल; दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल
Beed Tomato : 200 किलो टोमॅटोचा लाल चिखल; दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टोमॅटोचा लाल चिखल करून सामाजिक कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी लक्षवेधी आंदोलन केले. लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या टोमॅटोला सध्या पाच ते दहा रुपये प्रति किलो दर मिळतोय. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 200 किलो टोमॅटोचा लाल चिखल करून लक्ष वेधण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा.. अशी मागणी यावेळी करण्यात आली.. दरम्यान याचाच आढावा आणि बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी..
हे ही वाचा..
चैत्यभूमीवर सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (C P Radhakrishnan) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भाषणे झाली. मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणे वगळण्यात आल्याचे पाहायला मिळाले. याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता आदल्या रात्रीच ही भाषणे वगळण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी सरकारला डिवचले आहे.
रोहिणी खडसे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, दादा डोईजड होताय म्हणून आधी मंत्रालयातील फाईली दादांकडून भाईंकडे पाठवण्यात आल्या. त्यानंतर अर्थ विभागात लक्ष ठेवण्यासाठी स्वतःचा जवळचा अधिकारी आर्थिक सल्लागार म्हणून बसवला. मग भाईंचे पंख छाटण्यासाठी निधीत-पालकमंत्री पदात भेदभाव केला, असे त्यांनी म्हटले.






















