एक्स्प्लोर

मोठी बातमी : अंबादास लय काड्या करतो, दानवेंची तक्रार घेऊन चंद्रकांत खैरे 'मातोश्री'वर, ठाकरे मोठा निर्णय घेणार?

माजी खासदार चंद्रकांत खैरे मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले असून आमदार अंबादास दानवे यांच्याबद्दल ते तक्रार करणार आहेत.

मुंबई : शिवसेना पक्षाच फूट पडल्यानंतर बहुतांश आमदार-खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडली. त्यामध्ये, मराठवाड्यात ठाकरेंना मोठा धक्का बसला. मात्र, छ. संभाजीनगरमध्ये एकमेकांत शीतयुद्ध असलेल्या शिवसेना नेत्यांनी ठाकरेंसोबत राहणेच पसंत केले. माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant khaire) आणि आमदार अंबादास दानवे हे दोन नेते ठाकरेंच्या शिवसेनेत राहिले. मात्र, एकत्र असले तरी त्यांच्यातील मतभेद समोर येत आहेत. संभाजीनगरमधील एका कार्यक्रमाला चंद्रकांत खैरे यांना निमंत्रण नि दिल्याने त्यांनी संताप व्यक्त करत, अंबादास काड्या करतो, त्याची तक्रार मातोश्रीवर करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, आज लगेच ते मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. 

माजी खासदार चंद्रकांत खैरे मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले असून आमदार अंबादास दानवे यांच्याबद्दल ते तक्रार करणार आहेत. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात सुरू असलेल्या वादा नंतर खैरे हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाल्याने दोघांमध्ये नेमकं काय चर्चा होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात वाद सुरू असताना आपण अंबादास दानवे यांची तक्रार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे खैरा यांनी सांगितलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची ते भेट घेत असल्याचं कळतंय. तर पक्षप्रमुखांकडे जरी खैरे तक्रार करत असतील तर पक्षप्रमुख जे बोलतील त्या सूचना पाळू अशी भूमिका अंबादास दानवे यांनी मांडली आहे.  

मेळाव्याला न बोलवल्यावरुन वाद

शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे.  दोघांकडूनही एकमेकांवर टीका करण्यात येत असल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मागील आठवड्यात अंबादास दानवे यांनी बोलवलेल्या पक्षाच्या मेळाव्याला चंद्रकांत खैरे हे उपस्थित न राहिल्याने पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आला आहे. आपल्याला मेळाव्याला बोलवण्यात आलंच नव्हतं, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला. तसेच आपल्याला मेळाव्याला बोलवण्यात आलं नाही, त्यामुळे याबाबत आपण उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं होतं. तर, संभाजीनगरमध्ये मी शिवसेना वाढवली, अंबादास मागून आलाय. मात्र, अंबादास काड्या करतो, असेही खैरे यांनी स्पष्टपणे म्हटले होते. 

हेही वाचा

मंत्रिमंडळ बैठकीत एकनाथ शिंदेंच्या खात्याचे 3 धडाकेबाज निर्णय, नगराध्यक्षांना बहुमताने हटवणार; कॅबिनेटमध्ये 7 मोठे निर्णय

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
Shiv Sena: लोकसभा-विधानसभा 2029 साठी शिवसेनेचा मेगा प्लॅन, एकनाथ शिंदेंकडून उदय सामंत, श्रीकांत शिंदेंवर मोठी जबाबदारी
लोकसभा-विधानसभा 2029 साठी शिवसेनेचा मेगा प्लॅन, एकनाथ शिंदेंकडून उदय सामंत, श्रीकांत शिंदेंवर मोठी जबाबदारी
Vikas Lawande : शाईफेक झालेल्या विकास लवांडेंना अटक, शाई फेकणारे संग्राम भंडारे मोकाट, चोर सोडून संन्यासीला फाशी, लवांडेंचं टीकास्त्र
शाईफेक झालेल्या विकास लवांडेंना अटक, शाई फेकणारे संग्राम भंडारे मोकाट, चोर सोडून संन्यासीला फाशी, लवांडेंचं टीकास्त्र
Cockroach Janta Party: कॉकरोच जनता पार्टीवर पहिली कारवाई; प्रचंड लोकप्रियतेनंतर सोशल मीडियावर नेमकं काय घडलं?
कॉकरोच जनता पार्टीवर पहिली कारवाई; प्रचंड लोकप्रियतेनंतर सोशल मीडियावर नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive
Raj Thackeray Railway Bharti Andolan : रेल्वे भरती आंदोलन प्रकरणातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता
NEET Paper Leak : नीट पेपरफुटीप्रकरणी लातूरच्या डॉ. मनोज शिरुरेला अटक
Amravati MLC Election : अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक, पोटे तिसऱ्यांदा मैदानात?
Maharashtra on Petrol Diesel : देशात पुरेसा इंधनसाठा, मग इंधनटंचाई का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
इराणचा तोंड दाबून बुक्क्यांचा मारा देताच नेत्यानाहू अन् ट्रम्पच्या जिगरी दोस्तीत कुस्ती लागली! एक तासाच्या फोनाफोनीत शाब्दिक चकमकीत काय घडलं? गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
इराणचा तोंड दाबून बुक्क्यांचा मारा देताच नेत्यानाहू अन् ट्रम्पच्या जिगरी दोस्तीत कुस्ती लागली! एक तासाच्या फोनाफोनीत शाब्दिक चकमकीत काय घडलं? गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
Cockroach Janata Party Abhijeet Dipke: सत्तेत भाजप, प्रश्न त्यांनाच, सध्या उलटी लोकशाही सुरुय, मतदार सरकार निवडण्याऐवजी, सरकार ठरवतंय मतदान कोण करणार; 'काॅजप'च्या अभिजित दीपकेचा हल्लाबोल
सत्तेत भाजप, प्रश्न त्यांनाच, सध्या उलटी लोकशाही सुरुय, मतदार सरकार निवडण्याऐवजी, सरकार ठरवतंय मतदान कोण करणार; 'काॅजप'च्या अभिजित दीपकेचा हल्लाबोल
लोकसभेला 9 जागांवर आलेल्या भाजपला महाराष्ट्रात विधानसभेला कोणती जादूची छडी मिळाली? ममता, स्टॅलिन, केजरीवाल कसे पराभूत झाले?? काॅकरोच जनता पार्टीच्या अभिजितकडून निवडणूक आयोगाच्या कारभाराची चिरफाड
लोकसभेला 9 जागांवर आलेल्या भाजपला महाराष्ट्रात विधानसभेला कोणती जादूची छडी मिळाली? ममता, स्टॅलिन, केजरीवाल कसे पराभूत झाले?? काॅकरोच जनता पार्टीच्या अभिजितकडून निवडणूक आयोगाच्या कारभाराची चिरफाड
Kriti Kharbanda: 'ये मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है'! पंतप्रधानांच्या इटली दौऱ्यानंतर कृती खरबंदाची पोस्ट चर्चेत; ग्लॅमरस PHOTO' s ने चाहते घायाळ
'ये मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है'! पंतप्रधानांच्या इटली दौऱ्यानंतर कृती खरबंदाची पोस्ट चर्चेत; ग्लॅमरस PHOTO' s ने चाहते घायाळ
तब्बल 59 वर्षांनंतर तामिळनाडूमध्ये काँग्रेस सरकारचा भाग होणार; विजय यांच्या मंत्रिमंडळात आज दोन मंत्र्यांचा शपथविधी, व्हीसीके-आययूएमएललाही स्थान मिळण्याची शक्यता
तब्बल 59 वर्षांनंतर तामिळनाडूमध्ये काँग्रेस सरकारचा भाग होणार; विजय यांच्या मंत्रिमंडळात आज दोन मंत्र्यांचा शपथविधी, व्हीसीके-आययूएमएललाही स्थान मिळण्याची शक्यता
मराठी पोराच्या कॉकरोच जनता पार्टीचा सोशल मीडियामध्ये अक्षरशः धुमाकूळ; देशातील राष्ट्रीय पक्षांना अवघ्या काही तासात मागे टाकत केला इन्स्टावर फाॅलोअर्सचा विक्रम, तरुणाईचा उद्रेक असल्याची चर्चा
मराठी पोराच्या कॉकरोच जनता पार्टीचा सोशल मीडियामध्ये अक्षरशः धुमाकूळ; देशातील राष्ट्रीय पक्षांना अवघ्या काही तासात मागे टाकत केला इन्स्टावर फाॅलोअर्सचा विक्रम, तरुणाईचा उद्रेक असल्याची चर्चा
Amaal Malik On Industry Dark Side: वडील-चुलत्यांचं मोठं नाव, तरीही स्टारकीडला इंडस्ट्रीत मिळेना काम; खळबळजनक दावा करत म्हणाला, 'बॉलिवूडवाल्यांनी 60 फिल्म्समधून बाहेर काढलं...'
वडील-चुलत्यांचं मोठं नाव, तरीही स्टारकीडला इंडस्ट्रीत मिळेना काम; खळबळजनक दावा करत म्हणाला, 'बॉलिवूडवाल्यांनी 60 फिल्म्समधून बाहेर काढलं...'
Embed widget