Navi Mumbai Viral Video : चालत्या कारच्या डिग्गीत लटकता हात, वाशी-सानपाडा दरम्यान थरारक दृश्य, Reel साठी टोक गाठल्याचं उघड!
Navi Mumbai Viral Video: नवी मुंबईतील वाशी आणि सानपाडा रेल्वे स्थानकांदरम्यान एका इनोव्हा कारच्या डब्यातून एका माणसाचा हात बाहेर लटकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडालीय.

Navi Mumbai Viral Video : नवी मुंबईतील वाशी आणि सानपाडा रेल्वे स्थानकांदरम्यान एका इनोव्हा कारच्या डब्यातून एका माणसाचा हात बाहेर लटकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सानपाडा आणि वाशी रेल्वे स्थानकांदरम्यानच्या सर्व्हिस रोडवर चालणाऱ्या इनोव्हा कारमध्ये एका व्यक्तीचा हात लटकलेला मागून येणाऱ्या वाहनातील नागरिकांना दिसला. यानंतर मागून येणाऱ्या दुसऱ्या चालकाने त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओमध्ये लटकलेल्या हाताकडे पाहून व्हिडिओ बनवणारा व्यक्ती म्हणत होता, "असे दिसते की हा एखाद्या मृत व्यक्तीचा मृतदेह आहे किंवा कोणीतरी त्याची हत्या करून गाडीत ठेवला असावा."
पोलीस तपासात समोर आलं धक्कादायक करण
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक तात्काळ कारवाईला लागले. दरम्यान पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत सोमवारी संध्याकाळी 6.45 च्या सुमारास हा व्हिडिओ चित्रित करण्यात आल्याची माहिती समोर आली आणि रात्री 8.30 च्या सुमारास पोलिसांनी मुंबईतील घाटकोपर परिसरात कार पकडली. यात पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक करण समोर आलं असून कारमध्ये बसलेले तीन तरुण त्यांच्या लॅपटॉप ब्रँडच्या प्रमोशनशी संबंधित एक रील बनवत असल्याचे पुढे आले आहे.
तीनही तरुण मुंबईचे रहिवासी
गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त अजय लांडगे यांनी याबत अधिक माहिती देत सांगितले की, “तिघेही तरुण मुंबईचे रहिवासी आहेत आणि ते एका लग्नाला उपस्थित राहण्यासाठी नवी मुंबईत आले होते. त्याने हा व्हिडिओ त्याच ठिकाणी शूट केला. आम्ही त्याला ताब्यात घेतले, त्याची चौकशी केली आणि सर्व तथ्यांची पुष्टी केली. तपासात काहीही संशयास्पद आढळले नाही.पोलिसांनी त्याने बनवलेले सर्व व्हिडिओ जप्त केले आणि त्यांची चौकशी केली. स्क्रिप्टनुसार, पहिल्या व्हिडिओमध्ये, गाडीच्या ट्रंकमधून कोणाचा तरी हात बाहेर येताना दिसतो, त्यानंतर एक बाईकर येतो आणि गाडी थांबवतो आणि डिग्गी उघडण्यास सांगतो. डिग्गी उघडताच, आत बसलेला तरुण म्हणतो, "तुम्हाला भीती वाटते का? पण मी मेलेला नाही, मी जिवंत आहे. आता आमच्या लॅपटॉपवर तुम्हाला मिळणाऱ्या उत्तम ऑफर्सबद्दल ऐका."
सानपाडा पोलीस ठाण्यात केस दाखल
सानपाडा येथे रिलसाठी गाडीच्या डिग्गीत बॅाडी असल्याचे भासविण्यात आले होते. याबाबत आमच्याकडे जागृत नागरिकांनी तक्रारी केली. या प्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात केस दाखल केली आहे. तरुणांनी रिलसाठी सेनसेटीव्ही गोष्टी करून शहरात भितीचे वातावरण तयार करू नये, असे आवाहन नवी मुंबई पोलीसचे ACP अजयकुमार लांडगे यांनी केलं आहे.
हे ही वाचा






















