Somnath Suryawanshi Parbhani : सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा नाकारली शासकीय मदत
Somnath Suryawanshi Parbhani : सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा नाकारली शासकीय मदत
उपविभागीय अधिकारी तहसीलदार तलाठी यांचे पथक गेले होते मदतीचा चेक घेवून सोमणाच्या आई आणि भावाने मदत घेण्यास दिला नकार-पथक परतले न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा सरकारी मदत नाकारली आहे.आज उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे,तहसीलदार आदि पथक सोमनाथची आई आणि भाव यांची भेट घेवून सरकारने जाहीर केलेली १० लाखांची मदत घेण्याची विनंती केली मात्र त्यांनी जोपर्यंत सोमनाथच्या मृत्यूला दोषी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मदत स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या पथकाला परतावे लागले.
हे ही वाचा
दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी बिगुल वाजले असून फेब्रुवारी महिन्यात येथील निवडणुका होत आहे. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये प्रामुख्याने ही निवडणूक होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही मैदानात उतरत आहे. अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनेही दिल्ली विधानसभेसाठी रणशिंग फुंकले असून येथील निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचंही नाव आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक राहिलेल्या मंत्री धनजंय मुंडेंचं (Dhananjay munde) नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या 20 स्टार प्रचारकांच्या यादीत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचेही नाव आहे.