Shiv Sena vs Congress : काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्षपदावर शिवसेनेचा डोळा?
रत्नागिरी : विधानसभेचे अध्यक्षपद मला मिळावं असं महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांना वाटतंय असं महत्वपूर्ण वक्तव्य शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे. ते चिपळून येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात तालिका सभापती म्हणून काम करताना भास्कर जाधव यांनी गैरवर्तन करणाऱ्या भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन केलं होतं. तसंच भाजपच्या अभिरुप विधानसभेतील माईक काढून घेण्याचा निर्णय घेतला होता.
शिवसेनेच्या कोट्यातील वनमंत्री पद देऊन अध्यक्ष पद घेऊ नये असा सल्लाही भास्कर जाधव यानी दिला. शिवसेनेकडे वनखातं राहून जर अधिकचं विधानसभा अध्यक्षपद मिळत असेल तर ते स्वीकारावं असंही ते म्हणाले.






















