(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharmila Pawar : पवार कुटुंबातील आणखी 'एक' व्यक्ती राजकारणात? शर्मिल पवार म्हणतात...
सातारा : बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Election) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar) गटाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) विजयी झाल्या. अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सुनेत्रा पवारांचा (Sunetra Pawar) पराभव झाला. बारामतीच्या जनतेनं सुनेत्रा पवारांना नाकारत सुप्रिया सुळे यांना कौल दिला. अजित पवार यांच्या पत्नीचा पराभव झाला. याआधी चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांचाही निवडणुकीत पराभव झाला होता. सुप्रिया सुळे जिंकल्यानंतर आता अजितदादांविरोधात युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांना विधानसभेला उतरवणार का? अशी चर्चा रंगली असताना रोहित पवार यांनी यावर रोखठोक उत्तर दिलं आहे.
युगेंद्र पवार विधानसभेला उतरणार?
महाराष्ट्रामध्ये लोकांच्या माध्यमातून आपल्या विचाराला यश मिळालं आहे. लोकांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. यशवंतराव चव्हाण यांचे विचार फक्त फोटो लावून मिळत नसतात. खऱ्या अर्थाने ते विचार जपावे लागतात, ते पवार साहेबांनी जपलेले आहेत. तत्व हे चव्हाण साहेबांसाठी महत्त्वाचे होते. पवार साहेब ते जपत आहेत. रोहित पवारांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे.
जनतेला फोडाफोडीचं राजकारण आवडत नाही
भाजपने परिवार फोडला, पक्ष फोडला. त्यांना वाटलं दिल्ली स्टाईल महाराष्ट्रात चालेल, त्यांना महाराष्ट्र कळलाच नाही. महाराष्ट्रातील लोकांना फोडाफोडीचं राजकारण आवडत नाही. आत्मक्लेष करण्यासाठी अजितदादा येतील का नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. जेव्हा अडचण असतात, तेव्हा इथे येणे, हे महत्त्वाचं असतं. यश मिळतं, तेव्हा देखील इथे येणं महत्त्वाचं असतं.
बच्चा बडा हो गया है
बच्चा म्हणून जे आम्हाला हिणवलं होतं, ते लोकांनी आम्हाला काल पाठिंबा देऊन दाखवून दिलं. आम्ही स्वतःला कार्यकर्ता समजतो. युवा पिढीला तुम्ही सहज घेऊ नका. बच्चा बडा हो गया है, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. साताऱ्यातील उमेदवार हरल्यानंतर रोहित पवारांनी आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे असं म्हटलं आहे. नेत्यांमुळे मतदान होत नसतं, लोकांमुळे मतदान होतं, हे काल लोकांनी दाखवून दिलं. उदयनराजे जिंकले, व्यक्तिगतरित्या आम्ही त्यांना व्यक्ती म्हणून शुभेच्छा देतो. पक्ष म्हणून आम्ही त्यांना शुभेच्छा देत नाही. ज्या पक्षाने पुरोगामी महाराष्ट्राला पाण्यात बघण्याचं काम केलं, त्यांच्याबरोबर ते असल्यामुळे आम्ही त्यांना शुभेच्छा देत नाही. भाजपच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी साताऱ्यात ताकद लावली होती. पैशासोबत नेत्याने देखील ताकद लावलेले होते, असं रोहित पवार म्हणाले.