Sanjay Raut on Mharashtra Election : कुछ तो गड-बड है, राऊतांची युतीवर टीका मुंबई राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने पहिल्याच फेरीत मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात 115 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत भाजपच मोठा भाऊ ठरत असल्याचे पाहायला मिळते. पहिल्या कौलनुसार महायुतीला 193 जागांवर आघाडी मिळाली असून 55 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. तर, इतरांमध्ये 8 जागांवर आघाडीवर असल्याची माहिती आहे. दरम्यान, 288 मतदारसंघाच्या सुरुवातीच्या कलानूसार, भाजपला 115, शिवसेना शिंदे गटाला 58, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला 42 जागा मिळताना दिसत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानूसार एकनाथ शिंदेंचं वर्चस्व-288 मतदारसंघाच्या सुरुवातीच्या कलानूसार एकनाथ शिंदेंची शिवसेना 56 जागांवर आघाडीवर आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना सध्या 17 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंपेक्षा मोठं यश मिळालं आहे. ठाकरेंच्या बाजूने सहानभुती आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु मतदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला साथ दिल्याचं सुरुवातीच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.