एक्स्प्लोर

Man Vidhan Sabha Election Result 2024 : जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला

Man Vidhan Sabha Election Result 2024 : माण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे जयकुमार गोरे विजयी झाले आहेत. जयकुमार गोरे यांनी प्रभाकर घार्गे यांचा पराभव केला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election :  सातारा : सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघात भाजपच्या जयकुमार गोरे यांनी विजयाचा चौकार मारला आहे. जयकुमार गोरे यांनी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रभाकर घार्गे यांचा पराभव केला आहे. जयकुमार गोरे यांनी या विजयासह माणमधून होत चौकार मारला आहे.  निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील 19 व्या फेरीपर्यंतच्या आकडेवारीनुसार जयकुमार गोरे यांना 144720 मतं मिळाली आहेत.  तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभाकर घार्गे यांना 96355 इतकी मतं मिळाली आहेत.   

जयकुमार गोरे यांचा चौकार 

माण विधानसभा मतदारसंघात 2009 च्या विधानसभा निवडणुकीवेळी जयकुमार गोरे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा वाटपात ती जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला होता. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर जयकुमार गोरे यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. 2014 ची विधानसभा निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे लढवल्यानं काँग्रेसकडून जयकुमार गोरे आमदार झाले होते. 2014 ते 2019 ही टर्म संपण्यापूर्वीच जयकुमार गोरे यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या चिन्हावर 2019 ची विधानसभा निवडणूक जयकुमार गोरे यांनी लढवली आणि ते विजयी झाले. जयकुमार गोरे 2024 ला भाजपच्या चिन्हावर दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत.  

2024 ला दणदणीत विजय

माण विधानसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीवेळी तिरंगी लढत झाली होती. भाजपकडून जयकुमार गोरे, शिवसेनेकडून शेखर गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रभाकर देशमुख उमेदवार होते. माण मतदारसंघातील या निवडणुकीत जयुकमार गोरे यांना 91469 मतं मिळाली. प्रभाकर देशमुख यांना 88426 मतं मिळाली. तर, शेखर गोरे यांना 37539  मतं मिळाली. जयकुमार गोरे यांना त्यावेळी तिरंगी लढतीचा फायदा झाला. यावेळी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे आणि प्रभाकर घार्गे यांच्यात थेट लढत झाली. या लढतीत जयकुमार गोरे विजयी झाले. जयकुमार गोरे यांना 144720 मतं मिळाली आहेत.  तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभाकर घार्गे यांना 96355 इतकी मतं मिळाली आहेत.   

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत हा माण मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघातून भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांना आघाडी मिळाली होती. 

इतर बातम्या : 

Karad North : बाळासाहेब पाटील पाच टर्म कराड उत्तरचे आमदार, सहाव्यांदा रिंगणात उतरणार.. भाजपकडून कोण? उत्तर सापडणार?

वाईत मकरंद पाटील पुन्हा रिंगणात, मदन भोसले की आणखी कोण विरोधात लढणार? लोकसभेला मतदारसंघात काय घडलेलं? मविआ की महायुतीला लीड मिळालेलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meet CM Devendra Fadnavis | एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटMaharashtra Bogus Drugs Scam : बनावट औषधांचं विषारी रॅकेट; रुग्णांच्या जीवाशी खेळ Special ReportAllu Arjun Gets Bail : अल्लू अर्जुनला अटक आणि जामीन; चेंगराचेंगरीप्रकरणी कारवाई Special ReportPriyanka Gandhi Speech : मोदींवर फटकेबाजी... प्रियांका गांधींचं लोकसभेत पहिलं भाषण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
Embed widget