एक्स्प्लोर

Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला वानखेडे मैदानावर शपथविधी; समोर आलं राज'कारण'

Maharashtra vidhansabha Results राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ 26 तारखेला संपत असल्यामुळे एक दिवस आधीच महायुती सरकार स्थापन करणार असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वनीय सूत्रांनी दिली आहे.

Maharashtra vidhansabha Results मुंबई : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे आता स्पष्ट झालं आहे. कारण, विधानसभा निवडणुकांच्या निकालात भाजप महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. तब्बल 200 पेक्षा जास्त जागांवर महायुतीला आघाडी असून अनेक उमेदवार विजयी देखील झाले आहेत. विशेष म्हणजे भाजपला 120 पेक्षा जास्त जागांवर आघाडी दिसत असून भाजपच राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, भाजप कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी आत्ताच भाजपचा मुख्यमंत्री (Chief Minister) होणार, देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशा आशयाचे बॅनरही झळकवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे, महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. त्यातच, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी 25 तारखेला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणून, महाराष्ट्राचा नवीन सरकारमधील मुख्यमंत्री कोण हे कोडे लवकरच उलगडेल. 

राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ 26 तारखेला संपत असल्यामुळे एक दिवस आधीच महायुती सरकार स्थापन करणार असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री कोण होणार हे पुढील 3 दिवसांतच स्पष्ट होईल, असे दिसून येते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे.  महायुतीत ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील, त्याचा मुख्यमंत्री, असं आमचं काही ठरलं नव्हतं. प्रथम निवडणुकीच्या निकालाचे अंतिम आकडे येऊ दे. मग आम्ही तिन्ही पक्ष ज्याप्रमाणे जागावाटपाच्या चर्चेसाठी बसलो होतो, त्याप्रमाणे एकत्र बसू. पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे.पी.नड्डा आणि तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून चर्चा करतील. आम्ही जशी निवडणूक लढलो तसा मुख्यमंत्रीपदाबाबतही एकत्र चर्चा करुन निर्णय घेऊ, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. त्यामुळे, एकनाथ शिंदेंकडूनही मुख्यमंत्रीपदावर दावा केल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, यंदा विधानसभेच्या निवडणुका गत 2019 च्या तुलनेत उशीरा झाल्याने विधानसभेचा कार्यकाळ पुढील तीन दिवसांत संपुष्टात येत आहे. त्यामुळे, 26 नोव्हेंबर पर्यंत राज्यात सरकार स्थापन होऊन महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल का हे पाहावे लागेल.  

आशिष फडणवीस यांची इच्छा

निकालाची अपेक्षा होती, असे निकाल येतील असे नाही पण सकारात्मक निकाल येतील असा विश्वास होता. कारण, लोकसभा निवडणुकीनंतर जी मेहनत सर्वांनी घेतली, त्यामुळे निकाल खूप चांगला आला. गेल्या 6 महिन्यांपासून मायक्रो लेव्हलवर काम सुरू होतं, ग्रासरुट लेव्हलपर्यंत काम केल्याशिवाय असा निकाल येत नाही. देवेंद्र फडणवीस हे गेल्या टर्ममध्ये मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. देवाभाऊंचा हा सर्वात स्ट्राँग पॉइंट आहे की, ही डसन्ट केअर अबाऊट... त्यांना पदाची काही फिकर नाही. राजकारणामध्ये पदं येत राहतात आणि जात राहतात, पण आपलं काम करत राहणे हीच देवाभाऊंची विशेषत: आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांचे सख्खे भाऊ आशिष फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. महायुतीला जे यश मिळतंय, त्यामध्ये भाजप मोठा पक्ष आहे. त्यामुळे, मुख्यमंत्रीपदाची संधी त्यांना मिळायला हवी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केलीय.

हेही वाचा

Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
Esther Anuhya case : इंजिनिअर तरुणीची बलात्कारानंतर हत्या, हायकोर्टाने फाशी सुनावलेला चंद्रभान सानप सुप्रीम कोर्टात निर्दोष!
इंजिनिअर तरुणीची बलात्कारानंतर हत्या, हायकोर्टाने फाशी सुनावलेला चंद्रभान सानप सुप्रीम कोर्टात निर्दोष!
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्याचा कबुलीनामा, पोलिसांची  लांबलचक चार्जशीट, वाचा शब्द जसाच्या तसा
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्याचा कबुलीनामा, पोलिसांची लांबलचक चार्जशीट, वाचा शब्द जसाच्या तसा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines at 1PM 28 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्सDhananjay Deshmukh Jalna : मनोज जरांगेंच्या आंदोलनात धनंजय देशमुख सहभागABP Majha Marathi News Headlines 12 PM Headlines at 12PM 28 January 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines at 11AM 28 January 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
Esther Anuhya case : इंजिनिअर तरुणीची बलात्कारानंतर हत्या, हायकोर्टाने फाशी सुनावलेला चंद्रभान सानप सुप्रीम कोर्टात निर्दोष!
इंजिनिअर तरुणीची बलात्कारानंतर हत्या, हायकोर्टाने फाशी सुनावलेला चंद्रभान सानप सुप्रीम कोर्टात निर्दोष!
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्याचा कबुलीनामा, पोलिसांची  लांबलचक चार्जशीट, वाचा शब्द जसाच्या तसा
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्याचा कबुलीनामा, पोलिसांची लांबलचक चार्जशीट, वाचा शब्द जसाच्या तसा
Bill Gates Pandemic: जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
Yavatmal News : 3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
Beed Police: बीडमध्ये पोलिसांसाठी आदेश, आडनाव घ्यायचं नाही, नावाने हाक मारायची; पोलीस अधीक्षक नवनीत कावतांनी फर्मान सोडलं
बीडमधील जातीयवादाला SP कावतांचा सुरुंग, आडनाव घ्यायचं नाही, एकमेकांना नावाने हाक मारा, पोलिसांना आदेश
Embed widget