Satara Special Report : होडीतून प्रवास, खडकातून पायवाट, जंगल सफारी, दुर्गम भागात उभारलं मतदान केंद्र
सातारा : भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असून सध्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका (Election) होत आहेत. लोकशाहीच्या या उत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हाव, यासाठी निवडणूक आयोग मतदार जागृती करतो. तसेच, मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. यंदा प्रथमच 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वृद्धांसाठी निवडणूक अधिकारी घरी जाऊन मतदान (voting) घेणार आहेत. त्यामुळे, मतदार व प्रशासन दोघांमध्येही वेगळाच उत्साह असल्याचं दिसून येतय. महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होत आहे. त्यात अशी काही उदाहरणं असतात, जी आपणापर्यंत पोहोचू शकत नाहीत. आपलं लक्ष फक्त शहरी भागांकडे राहतं. मात्र, अशी काही खेडी असतात, दुर्गम भाग असतात, की त्या ठिकाणी पराकाष्टा करुन बुथ उभी करावी लागतात. छत्रपती उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) उमेदवार असलेल्या मतदारसंघातही असंच एक बुथ आहे. जिथे पोहोचण्यासठी प्रशासनाने मोठी कसरत केली आहे.