एक्स्प्लोर
Maharashtra : प्रल्हाद साळुंखेला हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही - Ramraje Naik Nimbalkar
फलटणमधील (Phaltan) राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी भाजप नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील (Pralhad Salunke-Patil) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'त्याला (प्रल्हाद साळुंखे) हिसका दाखवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही,' असा थेट इशारा रामराजे यांनी दिला. फलटणमधील एका डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच प्रकरणात विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांवरून बोलताना, '७७ व्या वर्षी तुरुंगात टाकाल तर टाकच,' असे आव्हानच निंबाळकर यांनी दिले आहे. फलटणमधील घटनांना न शोभणारे संबोधून त्यांनी निषेध व्यक्त केला आणि हे एक राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















