एक्स्प्लोर
Murldhar Mohol Vs Ravindra Dhangekar : गाडी आणि बिल्डर लॉबीवरून नवा आरोप, मोहोळ-धंगेकर वाद पेटला
पुण्यातील राजकीय वातावरण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे तापले आहे. 'तुम्ही झिरो आहात, तुमच्या आजूबाजूला कमल नाही दिसलं तर तुम्हाला कुत्रंही विचारणार नाही,' अशा शब्दात रवींद्र धंगेकर यांनी मोहोळांवर थेट हल्लाबोल केला आहे. मोहोळ महापौर असताना बडेकर बिल्डरची (Badekar Builder) इनोव्हा क्रिस्टा (Innova Crysta) गाडी वापरत होते, असा दावा धंगेकर यांनी केला आहे. तसेच, वेताळ टेकडी (Vetal Tekdi) प्रकल्प आणि कामांचे टेंडर बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर प्रत्युत्तर देताना, आपण अडीच वर्षे स्वतःच्या खर्चाने गाडी वापरणारा पहिला महापौर होतो, असे मोहोळ यांनी सांगितले. ज्या गाडीचा उल्लेख होत आहे, ती बडेकर प्रॉपर्टीजमधील भागीदारीतील असून, याची माहिती लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दिली असल्याचं स्पष्टीकरण मोहोळ यांनी दिलं आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















