एक्स्प्लोर
Life Savers Training: रस्त्यावर अपघात झाल्यास 'ते' ठरतील देवदूत, Mumbai Police साठी विशेष प्रशिक्षण
मुंबईतील वाहतूक पोलिसांसाठी पवई येथील डॉक्टर एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटलच्या वतीने 'बेसिक लाईफ सपोर्ट' (Basic Life Support) प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात हॉस्पिटलमधील अपघात आणि आपत्कालीन विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर सम्राट चव्हाण यांनी पोलिसांना मार्गदर्शन केले. 'रस्त्यावर वाहतुकीचे नियंत्रण करताना एखादा अपघात घडल्यास, सीपीआर आणि इतर जीवनरक्षक कौशल्यांचे हे प्रशिक्षण पोलिसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल,' हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता. या महत्त्वपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमात ८० हून अधिक वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला, ज्यात त्यांना सीपीआरसह (CPR) इतर आपत्कालीन कौशल्यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















