Maharashtra Ration Supply : ठप्प रेशन, लोकांना टेन्शन; राज्यात आणखी दोन दिवस धान्य पुरवठा रखडणार
राज्यभरातील तब्बल ७ कोटी लोकांसमोर मोठी अडचण निर्माण झालीय....राज्यभरातील रेशन दुकानातून होणारं धान्यवाटप सध्या ठप्प झालंय. आणि पुढील दोन दिवस रेशनिंग दुकानावर धान्य वाटप होणार नाहीय. लाभार्थ्यांची माहिती इंटरनेटवर अपडेट करत असल्याने धान्य वाटप होणार नसल्याची माहिती आहे. राज्यभरातील लाभार्थ्यांची माहिती सेव्ह केली जाते, त्या क्लाऊडची मुदत संपल्यानं सर्व डेटा दुसरीकडे शिफ्ट करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे आणखी दोन दिवसांनी रेशनिंग वाटप सुरळीत होईल. राज्यात अंदाजे ७ कोटी लाभार्थी असून या महिन्यातील आतापर्यंत ५ टक्के रेशन वाटप करण्यात आलंय. दरम्यान या ई पॉसच्या समस्येमुळे रेशन धान्याचा काळा बाजार वाढण्याची भीती वर्तवण्यात येतेय...
लाखो गरजुंना ज्या ई-पॉस मशिनच्या माध्यमातून धान्य मिळतं... ती ई पॉस मशिन नेमकी काय आहे? कशी काम करते? तिचं महत्त्व काय? हे पाहूया...
हिंगोलीतही ई पॉज मशीनचे सर्वर डाऊन आसल्याने रेशन दुकानावरील धान्य वाटप बंद आहेत.. गेल्या १३ दिवासंपासून धान्य वाटप बंद असल्यावनं सर्व लाभार्थ्यांचे हाल झालेत..
संभाजीनगरमध्ये गेल्या ४ दिवसांपासून रेशन दुकांनावरील धान्य वाटप ठप्प आहे,,
जुलै महिन्यातही असाच प्रसंग ओढवला होता. रेशन वितरणाची यंत्रणा अशीच अनेक दिवस पूर्ण बंद पडली होती. त्यावेळी लोकांची ओरड पाहता ऑफ-लाईन धान्य वितरण सुरू करण्यात आलं होतं. पण ... एकूणच ऑफ-लाईन धान्य वितरणाची वेळ येऊ नये. कारण देशातील गरीब उपाशी पोटी झोपू नयेत, ह्यासाठी मुळात हि स्वस्त धान्य दुकानांची योजना. पण ऑफ-लाईन पद्धतीने राशन वाटप करत असताना देशात ह्या व्यवस्थेचा गैरफायदा घेणारी एक पूर्ण साखळी मध्यंतरीच्या काळात तयार झाली होती. कधी खोटे रेशन कार्ड तर कधी गोदामात पोहचायचे आधीच वाटमारी करून हे दलाल आपले खिसे भरायचे... आणि ते होऊ नये म्हणूनच ह्या व्यवस्थेत आणले गेले हे ई पोस मशीन ...पण जर हे ई पोस सर्व्हर असेच सतत बंद पडणार असेल आणि रेशन दुकानातून लाखोंना धान्य मिळण्यात खंड पडणार असेल, तर परत एकदा गरीबाच्या पोटाची खळगी भरणे आणि गैरव्यवहार थांबवणे हे मूळ उद्देशच धोक्यात येतात...त्यावर कायमस्वरुपी उपाय करायला हवा...