Sanjay Rathod | .... तर संजय राठोड यांना आमदारकीचाही राजीनामा द्यायला सांगू: महंत जितेंद्र महाराज
मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा असा दबाब मुख्यमंत्र्यांवर वाढत असताना आता पोहरादेवीच्या मंहंतांनी मुख्यंमंत्र्यांना एक पत्र लिहलंय. संजय राठोड यांचा तडकाफडकी राजीनामा घेऊ नये अशी विनंती त्या पत्रात करण्यात आली आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्यास त्यांना पोहरादेवीवरुन शिवसेनेच्या आमदारकीचाही राजीनामा द्यायची विनंती करू असंही मंहंतानी सांगितलंय.
महंत जितेंद्र महाराज यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलंय की, "पूजाwwe चव्हाण आत्महत्येप्रकरणी संपूर्ण प्रकरणाची योग्य चौकशी झाली पाहिजे. चौकशीतून सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये. जर त्यांचा तडकाफडकी राजीनामा घेतला तर या ठिकाणी पोहरादेवीवरुन त्यांना आम्ही शिवसेनेच्या आमदारकीचाही राजीनामा द्यायला सांगू."






















