एक्स्प्लोर
Viral Video: नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात अस्वलाला पाहून बिबट्याची पळापळ, Video पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात (Navegaon-Nagzira Tiger Reserve) एक वेगळीच घटना समोर आली आहे, जिथे एका बिबट्याची (Leopard) आणि अस्वलाची (Bear) अनपेक्षित भेट झाली. 'अस्वलला पाहून हा बिबट्या घाबरला आणि त्यानं माघारी परतण्याचा निर्णय घेतला'. सामान्यतः बिबट्यासारखे शिकारी प्राणी इतर प्राण्यांवर झडप घालतात, पण इथे चित्र पूर्णपणे वेगळे दिसले. झुडपातून रस्त्यावर आलेल्या बिबट्याच्या समोर अचानक एक मोठे अस्वल आले, ज्यामुळे बिबट्या घाबरला आणि त्याने चोर पावलांनी जंगलात धूम ठोकली. हा संपूर्ण प्रकार पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून, हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या घटनेमुळे वन्यजीवप्रेमींमध्ये आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
मुंबई
महाराष्ट्र
कोल्हापूर
Advertisement
Advertisement


















