Jalgaon Fire | जळगावातील मोहाडीगावलगतच्या जंगलात वणवा; 100-150 एकर जंगल जळून खाक
जळगाव तालुक्यातील मोहाडी गाव परिसर लगत असलेल्या जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर वणवा पेटल्याने 100 ते दीडशे एकर वरील जंगल जळून खाक झाले असल्याच पाहयला मिळाले आहे. रात्री अकरा वाजताच्या सुमारास मोहाडी गावालगत असलेल्या डोंगरावर आग लागल्याचं दिसून आले होते. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण करून पसरण्यास सुरुवात केली. हे लक्षात आल्यावर अनेक पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक गावकरी आग विझविण्यासाठी पुढे आल्याच दिसून आले आहे. अग्नीशमन दलाचे बंब ही या गावाच्या जवळ येऊन पोहोचले होते. मात्र उंच डोंगर आणि त्यावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांचा फारसा उपयोग होऊ शकला नसल्याने आग वाढतच जात असल्याच दिसून आलं. त्यानंतर गावकऱ्यांनी मिळेल त्या झाडाच्या फांद्या हातात घेऊन ही आग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले असले, तरी शंभर ते दीडशे एकर वरील जंगल मात्र जळून खाक झाल्याचे पाहायला मिळाले होते. यामध्ये काही वन्य जीव सुद्धा जळून मेल्याचा प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं आहे
![Chandrashekhar Bawankule PC | योजना बंद ते लाडक्या बहिणींचं बजेट, बावनकुळेंची पत्रकार परिषद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/0093bc863ece82093f0c432c9a8bb82a1739717193950718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ajit Pawar PC Nashik | धनंजय मुंडेंनी ठरवावं की राजीनामा द्यावा का? अजित पवार स्पष्टच म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/d3cb968e47c7016316edc5cf8ec2984b1739716914406718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![CM Devendra Fadnavis : कोण-कोणाला भेटलं यावर राजकारण नको : देवेंद्र फडणवीस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/3ae832ef4285510d4269bc3cb80c730a1739714059642718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sushma Andhare : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/9d97540725ba735b2742c53d6310338a1739708921135718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/7ae6ccea4938be66aa562bb75ed173081739706263697718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)