Jaitapur Nuclear Plant : जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता, केंद्राची तत्वतः मंजूरी
रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत मोठी बातमी आहे. स्थानिक आणि शिवसेनेच्या विरोधामुळे वादात अडकलेल्या या मोठ्या प्रकल्पात सहा न्यूक्लिअर रिअॅक्टर बसवण्यास केंद्र सरकारनं तत्वतः मंजूरी दिल्याची माहिती काल राज्यसभेत देण्यात आली. अणुऊर्जा खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी काल राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिलीय. त्यामुळे रखडलेला जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झालीय. फ्रान्सच्या तांत्रिक सहकार्यातून 1650 मेगावॅट क्षमतेचे सहा न्यूक्लीअर रिअॅक्टर लावण्यास तत्वतः मंजुरी देण्यात आल्यानं 9900 मेगावॅट क्षमतेचा हा देशातला सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प ठरणार आहे.





















