एक्स्प्लोर

इराण-इस्रायल युद्ध: सोन्याच्या किंमती वाढत असताना दागिन्यांवर कर्ज घ्यावं की नको? नेमके काय आहेत धोके? जाणून घ्या सविस्तर माहिती

देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत. ज्यामुळं सामान्य लोकांमध्ये सोन्याच्या कर्जाची इच्छा वाढत आहे. मात्र तज्ञांनी याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

Iran-Israel War : मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये अशांतता निर्माण झाली आहे. जगात जेव्हा जेव्हा युद्धासारखी परिस्थिती उद्भवते तेव्हा गुंतवणूकदार घाबरून सोन्यात पैसे गुंतवतात. ज्यामुळं सोन्याच्या किमती (Gold Price)  झपाट्याने वाढतात. देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत. ज्यामुळं सामान्य लोकांमध्ये सोन्याच्या कर्जाची इच्छा वाढत आहे. मात्र तज्ञांनी याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

सोन्याच्या किमती वाढल्यामुळे, लोक आता जुन्या दागिन्यांवर जास्त कर्ज घेऊ शकतात

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी सोन्याच्या कर्जात अंदाजे 125 टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या किमती वाढल्यामुळे, लोक आता जुन्या दागिन्यांवर जास्त कर्ज घेऊ शकतात. तथापि, तज्ञांचे म्हणणे आहे की येथेच सर्वात मोठा धोका आहे. जेव्हा सोन्याचे भाव वाढतात तेव्हा तुमच्या तारण ठेवलेल्या दागिन्यांचे तारण मूल्य वाढते. बँका आणि वित्त कंपन्या सोन्याच्या बाजार मूल्याच्या 75 टक्क्यांपर्यंत कर्ज देतात. महागडे सोने लोकांना त्यांच्या आर्थिक क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेण्यास प्रवृत्त करू शकते, जे नंतर महागडे ठरू शकते. SMC ग्लोबल सिक्युरिटीजच्या वंदना भारती म्हणाल्या की युद्धाच्या बातम्यांमुळे किंमतींमध्ये होणारी वाढ अनेकदा भावनिक आणि तात्पुरती असते. तणाव कमी होताच, किंमती झपाट्याने कमी होऊ शकतात.

सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ

संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव आता अधिक तीव्र झाला आहे. अशातच या संघर्षाचा विस्तार झाल्यास त्याचे परिणाम संपूर्ण मध्यपूर्वेत जाणवू शकतात. इराणने (Israel Vs Iran War) प्रत्युत्तरादाखल काही देशांमधील अमेरिकेंच्या बेसवरती हल्ले केल्याचे वृत्त समोर आले असून परिस्थिती अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. याचा थेट परिणाम भारतावरही पुढील काही दिवसांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Israel Vs Iran War) दुसरीकडे, अमेरिका आणि इजरायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर अवघ्या काही तासातच सोन्याच्या आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today)  मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यापासून रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून सोन्याच्या आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price) मोठी वाढ झाल्यानंतर त्यात मागील महिन्यात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळाले होते. मात्र, काल अमेरिका आणि इजरायलने इराणवर केलेल्या हल्ल्याच्या नंतर गुंतवणूकदार हे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या आणि चांदीच्या खरेदीकडे वळल्याने सोन्याच्या आणि चांदीच्या मागणीत वाढ झाल्याचे चित्र आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Embed widget