(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022 : क्रीडाप्रेमींसाठी खुशखबर! IPL साठी 25 टक्के प्रेक्षकांना परवानगी, तिकीट विक्री सुरू
इंडियन प्रीमिअर लीगच्या ((IPL 2022) पंधराव्या मोसमाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून अवघ्या तीन दिवसांनंतर ही स्पर्धा सुरू होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज) आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK Vs KKR) संघात पहिला सामना 26 मार्च रोजी खेळला जाणार आहे.
या लढतीपूर्वी क्रीडाप्रेमींसाठी खुशखबर आली असून बीसीसीआयने आयपीएल लढतींसाठी तिकीट विक्री सुरू केली आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेमध्ये गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या संघांचा नव्याने समावेश करण्यात आल्याने 10 संघांमध्ये आयपीएल चषकासाठी झुंज पाहायला मिळेल. दोन गटांमध्ये विभागलेल्या या संघांमध्ये एकूण 70 सामने खेळले जाणार आहेत. मुंबई आणि पुण्यातील मैदानांवर या सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून कोरोनामुळे महाराष्ट्र सरकारकडून 25 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे.
IPL 2022 'अनसोल्ड' खेळाडूंचे नशिब फळफळलं, कोट्यवधींची रक्कम घेऊन मैदानात उतरणार
'येथे' मिळेल तुम्हाला तिकीट
दरम्यान, बुधवारी 12 वाजल्यापासून आयपीएलच्या तिकीटांची विक्री सुरू झाली आहे. आयपीएलची अधिकृत वेबसाईट www.iplt20.com सह www.BookMyShow.com या वेबसाईटवर देखील तुम्ही या तिकीटांची खरेदी करू शकता.