Eknath Shinde meet Manohar Joshi : एकनाथ शिंदे मनोहर जोशींच्या भेटीला ABP Majha
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि नगरसेवकांपाठोपाठ स्थानिक फोडल्यानंतर आपलं लक्ष पहिल्या फळीतल्या ज्येष्ठ नेत्यांवर केंद्रित केलं आहे. त्यांनी शिवसेनेतल्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. शिंदे यांनी आज सकाळी लिलाधर डाकेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी संध्याकाळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याशी संवाद साधला. डाके आणि जोशी हे दोघंही शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. त्यांचे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळं आता शिंदेंकडून शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न होत आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.






















