Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुती, हिंदू आणि मराठीच होणार असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. पण परवा वारीस पठाण बोलून गेले बुरखेवाली मेयर बनेगी, मात्र सकाळचा भोंगा त्यावर बोलेना असा टोला फडणवीस यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना लगावला. एक जणही त्यावर बोलायला तयार नाही. आम्हालाच चार्ज करावं लागेल आणि सांगावं लागेल महापौर हिंदूच बनेल आणि मराठीच बनेल असे फडणवीस म्हणाले. आमचं धर्माशी वैर नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
वंदे मातरम म्हणायला नकार देतात त्याला आमचा विरोध
वंदे मातरम म्हणायला नकार देतात त्याला आमचा विरोध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. माहिम दर्गावर सांगितलं तेव्हा मी चादर चढवली आणि तिरंगा फडकवला असे मुख्यमंत्री म्हणाले. भारताशी दुश्मनी असलेल्यांना सोडणार नाही असेही ते म्हणाले. तिकडच्या सभेत तुम्हाला वंदे मातरम् ची घोषणा दिसणार नाही. बांगलादेशी मागील 6 ते 7 महिन्यात आम्ही परत पाठवले. बंगालमधून आलेला ममता दीदींच्या आशीर्वादाने आलेला बंगलादेशी परत पाठवू आणि हे केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मराठी माणूस हद्दपार झाला पाप कोणाचं?
मराठी माणूस हद्दपार झाला पाप कोणाचं? गिरणी कामगार हद्दपार झाला कोणामुळे? फिक्स्ड डिपॉझिटच्या रसिदी चाटायच्या का? असे सवाल मुख्यमंत्र्यांनी केले. दोन हजार कोटी जरी काढले असते तरी गिरणी कामगार वाचला असता. बीडीडी चाळ आम्ही निर्माण केली, 80 हजार लोकं वाट बघत होते, मात्र यांनी बिल्डर्सच्या नादात सत्यानाश केला. आम्ही निर्णय केला स्वत: म्हाडा बांधेल आणि आज इमारती उभ्या करत चाव्या दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.




















