Maharashtra Schools : शाळांबाबत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज चाईल्ड टास्क फोर्सची बैठक
सद्यस्थितीत राज्यात शाळा पुन्हा सुरू करता येऊ शकतात का ? या संदर्भात आज चाईल्ड टास्क फोर्सची आज बैठक
बैठकीनंतर राज्य सरकारकडे चाईल्ड टास्क फोर्स सदस्यांचा एकत्रित मत पाठवणार
शाळा सुरू करण्यासंदर्भात चाईल्ड टास्क फोर्सच्या मताचा विचार करून उद्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील कुठल्या भागात शाळा सुरू केल्या जाऊ शकतात ?याबाबत चर्चा होणार
राज्यातील शाळा जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे किंवा अजिबात नाही तिथे सुरू करण्यासंदर्भात चाईल्ड टास्क फोर्समधील काही सदस्य हे सकारात्मक आहेत.
राज्यातील सर्व शाळांबाबत सरसकट निर्णय न घेता स्थानिक पातळीवर कोरोना परिस्थितीचा विचार करून शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घेण्याचा अधिकार देता येईल, यावर विचार केला जातोय
मुंबई सारख्या शहरात रुग्णसंख्या कमी जरी होत असली तरी आणखी 10 ते 15 दिवस आढावा घेऊन या ठिकाणी असलेल्या शाळांचा विचार केला जावा, अस मत चाईल्ड टास्कफोर्स मधील तज्ञांचा आहे