Uddhav Thackeray Discharge : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूंच्या दुखापतीचा त्रास बळावळा होता. त्यामुळे ते मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. मागील आठवड्यापासून मुख्यमंत्र्यांना हा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे तीन दिवस ऍडमिट होण्याच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल होते. आता त्यांच्यावर 12 नोव्हेंबरला शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. यानंतर ३दिवस त्यांनी रुग्णालयातच विश्रांती घेतली आहे.मात्र त्यानंतर आता उद्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे अशी माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबरला सकाळी 7:30 वाजता HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली. वरिष्ठ ऑर्थो सर्जन डॉक्टरांच्या टीमने सुमारे तासभर ही शस्त्रक्रिया केली. सकाळी 8:45 वाजता डॉक्टरांची टीम ऑपरेशन करून बाहेर आली आणि त्यांनी ऑपरेशन यशश्वी झाल्याचं सांगितलं. यानंतर ते रुग्णालयातच डॉक्टरांच्या देखभाली खाली होते . मात्र आता ते घरी जाऊन आराम करू शकतात असं डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे उद्या मुख्यमंत्री घरी परतण्याची शक्यता आहे. यानंतर मुख्यमंत्री हे घरातच काही दिवस आराम करतील.