एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Chandrapur News : धानोरकरांसह झालेल्या जमीन व्यवहारात फसवणूक, नेमकं प्रकरण काय? ABP Majha
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसील कार्यालयात शेतकरी परमेश्वर मेश्राम यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी खळबळजनक आरोप केले आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर आणि दिवंगत बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांच्यावर हे आरोप आहेत. दिवंगत बाळू धानोरकर यांच्याशी जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाल्यामुळे परमेश्वर मेश्राम यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. धानोरकर कुटुंबियांच्या दबावामुळे कोर्टात केस जिंकूनही जमीन त्यांच्या नावावर होत नसल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. जमिनीचा सातबारा आमच्या नावावर करण्यात यावा, अन्यथा परमेश्वर मेश्राम यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे. या मागणीमुळे प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कुटुंबियांच्या या भूमिकेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















