Ajit Pawar Harshwardhan Patil: अजित पवार- हर्षवर्धन एकाच कार्यक्रमात ABP Majha
इकडे इंदापुरात भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र बसुन गप्पा मारतानाचा फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अजित पावरांसोबत गप्पा मारतानाचा हा फोटो स्वतः हर्षवर्धन पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मुलाचे पुण्यात लग्न होतं. या लग्न सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित अजित पवार, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर हर्षवर्धन पाटील, चंद्रकांत पाटील , दत्तात्रय भरणे आदी विविध मान्यवर उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांच्यात अनेकदा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतो परंतु आज हे दोन नेते एकत्र बसल्यामुळे राजकीय चर्चा झडू लागल्या आहेत.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
