Special Report Somvati Amvasya:नववर्षाचं निमित्त सोमवती अमावस्येमुळे तीर्थक्षेत्रावर भाविकांची गर्दी
Special Report Somvati Amvasya:नववर्षाचं निमित्त सोमवती अमावस्येमुळे तीर्थक्षेत्रावर भाविकांची गर्दी
सोमवती अमावस्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तीर्थक्षेत्रांवर भाविकांनी आज मोठी गर्दी केली . येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणांनी जेजुरीगड दुमदुमून गेला..पाहूया सोमवती अमावस्येनिमित्त सजलेल्या सोन्याच्या जेजुरीचा विशेष रिपोर्ट
हे ही वाचा..
भंडारा-खोबऱ्याची मुक्त उधळण करीत, येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोटचा जयघोष करीत गुरुवारी प्रति जेजुरी म्हणून संबोधल्या गेलेल्या नाशिकच्या मालेगाव येथील चंदनपुरी यात्रोत्सवास (Chandanpuri Yatrotsav) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सपत्नीक महापूजा करत वाघ्या मुरळीसह खंडोबाची तळी भरली. श्री क्षेत्र चंदनपुरी हे खंडेराव महाराजांच्या दुसरी पत्नी बानुबाईची माहेर असून खंडेराव महाराज (Khanderao Maharaj) चंदनपुरी येथे वास्तव्यास असताना सेवा केल्याने खंडेराव महाराज तिच्या प्रेमात पडले अशी आख्यायिका आहे. बानू आणि खंडेरायाचे वास्तव असल्याच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून दरवर्षी पौष पौर्णिमाचे निमित्ताने पंधरा दिवस ही यात्रा भरवली जाते.