एक्स्प्लोर
Man-Animal Conflict: 'माणसे जगवायची की बिबटे?', आढळराव पाटलांचा सरकारला थेट सवाल, शिरूरमध्ये संताप
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातल्या जांभूत येथे बिबट्याच्या हल्ल्यात भागोबाई जाधव या सत्तर वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने तणाव निर्माण झाला आहे. या घटनेनंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असता, त्यांना ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला. 'सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे की माणसे जगवायची आहेत की बिबटे जगवायचे आहेत?', असा संतप्त सवाल माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपस्थित केला. आठवडाभरातील हा दुसरा बळी असल्याने नागरिक संतप्त झाले असून, जोपर्यंत वनमंत्री घटनास्थळी येत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे. बिबट्यांची नसबंदी करणे आणि त्यांना पुन्हा अधिवासात न सोडता पुनर्वसन केंद्र उभारणे यांसारख्या उपाययोजनांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्र
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
आणखी पाहा




















