(Source: ECI/ABP News/ABP Majha)
100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
मुंबईसह कोकणात आजही मुसळधार पावसाचा अंदाज, रायगड, रत्नागिरीत रेड तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट
वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांची स्थानिक पोलिसांसोबत तब्बल साडेतीन तास चर्चा, रात्री ११ ते पहाटे दोन वाजेपर्यंत चर्चा झाल्याची माहिती
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मागवला पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल, अंबर दिव्याचा वापर आणि आईच्या पिस्तूलबाजीचे तपशील देण्याचे आदेश
पूजा खेडकरांचा आणखी एक प्रताप, मेडिकलसाठी प्रवेश घेताना पूर्णत: तंदुरुस्त, वडील क्लास वन असताना मिळवला नॉन क्रिमिलेयरचा दाखला
घाटकोपर होर्डिंग प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जबाबदारीची टोलवाटोलवी,
आजी-माजी रेल्वे पोलीस आयुक्त आमने-सामने
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावरील पुलाला भगदाड, १५ दिवसांपासून मुंबईला येणाऱ्या २ मार्गिका बंद, महामार्ग प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष