एक्स्प्लोर
Badlapur PHOTO : बदलापूरमध्ये अत्याचार, आंदोलन आणि लाठीचार्ज; 12 तासांमध्ये काय काय घडलं?
Badlapur School Girl Abused Case : शाळेतील दोन मुलींवर अत्याचार झाल्यानंतर बदलापूरकरांच्या असंतोषाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं.
Badlapur Protest Timeline - बदलापुरात काय काय घडलं?
1/12

रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करणाऱ्या बदलापूरकरांना पोलिसांनी लाठीचार्ज करत पांगवलं. तब्बल 12 तासांपासून बदलापूरकरांचं रेल्वे ट्रॅकवर आंदोलन सुरु होतं.
2/12

बदलापुरातल्या नामांकित शाळेत दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झाला होता. त्यानंतर बदलापूरकर आक्रमक झाले.
3/12

आंदोलकांनी रेल्वे ट्रॅकवर ठिय्या मारत आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी केली. निर्णय घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका घेतली.
4/12

पोलिसांनी आंदोलकांना रेल्वे ट्रॅक मोकळा करण्याची वारंवार विनंती केली.
5/12

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनीही आंदोलन मागे घ्यावं, राज्य सरकार दोषींना शिक्षा देईल असं आश्वासन दिलं.
6/12

तरीही आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवलं. शेवटी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि आंदोलकांना पांगवलं.
7/12

यावेळी आंदोलकांकडूनही पोलिसांवर दगडफेकीचा प्रकार घडला.
8/12

बदलापूरमधील शाळेच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली. सफाई कर्मचाऱ्यांनेच दोन चिमुकल्यांवर अत्याचार केला.
9/12

पालकांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. सुरूवातीला पोलिसांनी तक्रार न घेता पालकांना 12 तास ताटकळत ठेवलं.
10/12

त्यानंतर पालकांनी थेट शाळेवर हल्लाबोल करत शाळा फोडली.
11/12

या घटनेनंतर गृहमंत्र्यांनी संबंधित पोलिसांना निलंबित केलं आणि या प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना केली.
12/12

आयपीएस अधिकारी आरती सिंह या प्रकरणाचा तपास करणार असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार आहे.
Published at : 20 Aug 2024 07:13 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























