Kaun Banega Crorepati 16 : 'केबीसी'मध्ये ब्रेन ट्युमरग्रस्त नरेशी मीना नाही झाली करोडपती, तुम्हाला माहित आहे का या प्रश्नाचे उत्तर
Kaun Banega Crorepati 16 : ब्रेन ट्युमरने आजारी असलेल्या नरेशी मीनाने हा गेम अतिशय चांगला खेळला आणि 50 लाख रुपये जिंकले. मात्र एक कोटी रुपयांचा प्रश्न समोर आल्यावर त्याने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.
Kaun Banega Crorepati 16 : 'कौन बनेगा करोडपती 16' चा ( Kaun Banega Crorepati 16) लेटेस्ट एपिसोड चर्चेत आहे. हा एपिसोड खास ठरला आहे. या एपिसोडमध्ये यंदाच्या सीझनमध्ये एक कोटींच्या प्रश्नापर्यंत पोहचणारी नरेशी मीना (Nareshi Meena) ही पहिली स्पर्धक ठरली. नरेशी मीना ही ब्रेन ट्युमरनेग्रस्त आहे. या शोमधून जिंकलेल्या पैशातून उपचाराचा खर्च भागणार असल्याचे तिने म्हटले होते. नरेशी मीनाने हा गेम अतिशय चांगला खेळला आणि 50 लाख रुपये जिंकले. मात्र एक कोटी रुपयांचा प्रश्न समोर आल्यावर त्याने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. होस्ट अमिताभ बच्चन यांनी नरेशीच्या पॅशनचे खूप कौतुक केले.
ब्रेन ट्युमरशी झुंजतेय नरेशी
'KBC 16' च्या लेटेस्ट एपिसोडची सुरुवात राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील स्पर्धक नरेशी मीनासोबत झाली. नरेशीने अमिताभ बच्चन यांना सांगितले की त्यांना ब्रेन ट्यूमर आहे. या शोमधून मिळालेल्या पैशातून ती तिची ट्रीटमेंट करणार आहे. नरेशी मीना सवाई या माधोपूर येथील महिला सक्षमीकरण विभागात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय महिलांना बळ देण्याचे काम त्या करत आहेत. प्रोटॉन थेरपीसाठी 25-50 लाख रुपयांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
View this post on Instagram
अमिताभ बच्चन यांनी नरेशीच्या वडिलांशी संवाद साधला. त्यावेळी नरेशीच्या वडिलांनी सागितले की, शेतात काम करत असताना त्यांना अनेकदा विमाने उडताना दिसायची, पण एक दिवस ते स्वतः विमानाने प्रवास करतील असे कधीच वाटले नव्हते. त्यांना पहिल्या उड्डाणाचा अनुभव घेण्याची संधी देण्याचे श्रेय त्यांनी मुलीला दिले. अवघ्या 50 मिनिटांत 50,00,000 रुपये कमावल्याबद्दल नरेशीच्या वडिलांनीही आपल्या मुलीचे कौतुक केले.
काय होता एक कोटीचा प्रश्न?
यानंतर नरेशीला एक कोटींसाठी प्रश्न विचारण्यात आला. अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, फारच कमी वेळा एक कोटींचा प्रश्न विचारण्याची संधी मिळते. त्यानंतर नरेशीला सांगितले की त्यांच्याकडील तिन्ही लाइफलाईन संपल्या आहे. त्यानंतर अमिताभ बच्चन एक कोटींचा प्रश्न विचारतात.
प्रश्न होता, लीला राव दयाल कोणाचा पराभव करून विम्बल्डन टेनिस स्पर्धेत एकेरी सामना जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली?
> या प्रश्नाच्या उत्तरासाठी चार पर्याय देण्यात आले होते-
ए - लोटी डॉड
बी - ल्गॅडिस साउथवेल
सी - मे सेटन
डी - किटी गॉडफ्री
या प्रश्नावर खूप वेळ विचार केल्यानंतर नरेशी सांगते की, बी आणि सी या दोन पर्यायांवर द्विधा मनस्थिती असल्याचे सांगते. मात्र, आपण कोणतीही रिस्क घेणार नसल्याचे सांगत नरेशी शो सोडण्याचा निर्णय जाहीर करते आणि 50 लाख रुपयांवर समाधान व्यक्त करते. शो सोडताना ती ए पर्याय निवडते. मात्र, एक कोटीच्या प्रश्नाचे उत्तर बी-ल्गॅडिस साउथवेल हे असते.