Marathi Serial Updates Durga : सुरू होताच संपली 'अंतरपाट' मालिका! नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Marathi Serial Updates Durga : टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी जोरदार प्रयत्न मराठी वाहिन्यांकडून सुरू आहेत. त्याच अनुषंगाने प्रेक्षकांच्या भेटीसाठी नवीन मालिका येत आहेत. कलर्स मराठी वाहिनीवरही आता नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Marathi Serial Updates Durga : छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीची जोरदार स्पर्धा सुरू आहे. टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी जोरदार प्रयत्न मराठी वाहिन्यांकडून सुरू आहेत. त्याच अनुषंगाने प्रेक्षकांच्या भेटीसाठी नवीन मालिका येत आहेत. कलर्स मराठी वाहिनीवरही आता नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर, दुसरीकडे जून महिन्यात सुरू झालेली मालिका 'अंतरपाट' प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अंतरपाट मालिकेच्या वेळेवर आता दु्र्गा ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दुर्गा मालिका प्रेक्षकांच्या भेटीला...
बालपण खडतर, वाईट घटनांचं असेल तर ती व्यक्ती बालपणापासून एका वेगळ्याच वातावरणात वाढते. एकतर ती खंबीर होते किंवा खचते. अशीच या बालपणातून खंबीर झालेली बेधडक, अन्यायाला वाचा फोडणारी, आपल्या कुटुंबासाठी लढणारी आजच्या काळातील 'दुर्गा' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका 26 ऑगस्टपासून दररोज संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारीत होणार आहे. दुर्गाने बालपणापासून मोठ्या संघर्षाचा सामना करत खडतर आव्हानांना तोंड दिलंय. पण आता हीच 'दुर्गा' नक्की कोणतं रूप घेणार? 'दुर्गा'च्या रुपात घरात सुख येणार की सूड? प्रेम आणि कर्तव्यात 'दुर्गा' कशाची निवड करणार? या प्रश्नांचं कोडं लवकरच सुटणार आहे. 'दुर्गा' या पात्राभोवती फिरणारी ही मालिका आहे. तरुण, निडर, महत्वाकांक्षी, पत्रकारितेचं शिक्षण घेऊन त्यात उत्तम करिअर करणारी अशी ही 'दुर्गा' अभिषेकला भेटते. एकमेकांच्या भूतकाळाबद्दल अनभिज्ञ असलेले दुर्गा आणि अभिषेक लग्नबंधनात अडकतात. लग्नानंतर दुर्गाला हे कळतं की, ज्या दादासाहेब मोहितेंमुळे आपलं आयुष्य बदललं, ज्या कुटुंबाचा आपल्याला सूड घ्यायचा होता त्याच कुटुंबाचा उबंरठा आपण ओलांडला आहे. खरं प्रेम, सत्तासंघर्ष, पैशांसाठीची धडपड या गोष्टींमधून 'दुर्गा' आता कसा मार्ग काढणार? जोडीदाराशी इमान राखणार की वैऱ्याचा प्रतिशोध घेणार? हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल.
'दुर्गा' मालिकेबद्दल बोलताना कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे म्हणाले ,"कलर्स मराठी'वर काही दिवसांपासून विविध धाटणीचे आणि वेगवेगळ्या दर्जाचे कार्यक्रम येत आहेत. आताही नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं पण प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याच्या प्रयत्नातून 'दुर्गा' ही मालिका करण्याचा घाट घातला आहे. महाराष्ट्राच्या वास्तवाशी जोडणारी आणि फ्रेश जोडी असलेली ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक स्त्रीमध्ये असणाऱ्या दुर्गाची गोष्ट प्रेक्षकांना 'दुर्गा' या नव्या मालिकेत पाहता येणार आहे. यापुढे 'मनामनात दुर्गा, घराघरात दुर्गा' असणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून एका वेगळ्या विषयाला हाताळण्याचा आम्ही प्रयत्न केला असल्याचे केदार शिंदे यांनी सांगितले.
अंतरपाट' मालिकेला टीआरपीचा फटका?
'अंतरपाट' मालिकेला कमी टीआरपीचा फटका बसला असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेसाठी प्राइम टाईम देण्यात आला. पण, अपेक्षित टीआरपी खेचता आला नाही. त्यामुळे ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
'अंतरपाट' ही मालिका कलर्स कन्नडवरील मालिकेची रिमेक मालिका आहे. ही मालिका कन्नड शिवाय, तमिळ, हिंदी आणि गुजराती या भाषेतही प्रसारीत झाली होती. त्यातील कन्नडमधील मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. ही मालिका जवळपास 7 वर्ष चालली होती.तमिळमध्ये दोन वर्ष चालली होती. तर, इतर भाषेत रिमेक झालेल्या मालिकेने वर्षही पूर्ण केले नाही.