Mahayuti meeting on Kolhapur Lok Sabha : महायुतीची 'मिसळ पे चर्चा', क्षीरसागर, मंडलिक काय म्हणाले?
Mahayuti meeting on Kolhapur Lok Sabha : महायुतीची 'मिसळ पे चर्चा', क्षीरसागर, मंडलिक काय म्हणाले?
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने कंबर कसली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. शिवसेनेचे नेते आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शनिवार पेठ इथल्या शिवालय कार्यालयात मिसळ पे चर्चा या बैठकीचे नियोजन केलं होतं. या बैठकीला स्वतः खासदार संजय मंडलिक, भाजप आणि राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर शहरात महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही खासदार निवडून येतील असा विश्वास राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.