Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
जसा कुस्तीसाठी पैलवानांना खुराक लागतो तसा कुस्तीच्या आखाड्याला देखील खुराक लागत असतो..
कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्यानंतर शेजारी असलेल्या खासबाग मैदानाचे व्यासपीठ देखील जाळलेलं होतं. त्यामुळे वर्षभराहून अधिक दिवस राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेलं खासबाग कुस्ती मैदान बंद होतं....या कुस्ती आखड्याची दुरावस्था होती. मात्र आता हा आखाडा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे...या आखड्याच्या मातीला खुराक देऊन माती कुस्तीसाठी पोषक बनवली जातेय..ज्या पद्धतीने पैलवानाला खुराक दिला जातो त्याच पद्धतीने आखाड्यातील मातीलाही खुराक द्यावा लागत असतो..आमदार अमल महाडिक यांनी यासाठी लागणारे सर्व साहित्य दिलं. जवळपास 10 पोती लिंबू, 10 पोती हळद, 10 तेलाचे डबे, 2 पोती काव, 50 लिटर दूध यासह इतरही घटक या मातीत मिसळले.. गंगावेश तालीमचे पैलवान आणि कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते विजय साळोखे सरदार यासह इतरही काही कार्यकर्ते यासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे खासबाग मैदानावर आता तब्बल एक वर्षानंतर शड्डू घुमणार आहे...























