Balu Mama Trust Special Report : बाळूमामा देवस्थान ट्रस्टींमध्ये फ्री स्टाईल राडा, नेमकं कारण काय?
Balu Mama Trust Special Report : बाळूमामा देवस्थान ट्रस्टींमध्ये फ्री स्टाईल राडा, नेमकं कारण काय?
बाळूमामा ट्रस्टच्या विश्वस्त आणि कार्याध्यक्षांच्या निवडीवरून झालेल्या वादाचं पर्यावसान काल हाणामारीत झालं होतं. त्यानंतर आज बाळूमामा मंदिर आवारात विश्वस्त आणि कार्याध्यक्ष निवडीसाठी बैठक बोलावण्यात आली होती. पण कालच्या वादाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तणावपूर्ण होतं. त्यामुळं गावकऱ्यांनी पोलिसांना हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर मंदिर परिसरात बैठक न घेण्याच्या सूचना पोलिसांनी दोन्ही गटांना केल्या. परिणामी विश्वस्त आणि कार्याध्यक्ष निवडीसाठी होणारी बैठक रद्द करण्यात आली. दरम्यान, अधिकृत विश्वस्त निवडीचं पत्र दुपारी धर्मादाय आयुक्तांकडे कोल्हापुरात दिलं जाणार आहे.






















