(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Laxman Hake Jalna :पंकजा मुंडे आणि जानकरांच्या पराभवासाठी जरागेंनी बैठका घेतल्या; हाकेंचा गंभीर आरोप
Laxman Hake Jalna :पंकजा मुंडे आणि जानकरांच्या पराभवासाठी जरागेंनी बैठका घेतल्या; हाकेंचा गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या नादी लागून कितीतरी तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. व्यवस्थेनं मराठा समाज आणि तरुणांमध्ये संभ्रम निर्माण केला असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे. लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. जरांगे यांनी पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांना पाडण्यासाठी बैठका लावल्याचा देखील हाके यांनी केला. हाके यांनी शरद पवारांवर सुद्धा टीका केली. पवार निवडणुका जिंकण्याचे फक्त मॅनेजमेंट गुरु असून त्यांनी इथले लोक सोबत घेतले असते, तर ते केव्हाच पंतप्रधान झाले असते असे देखील लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. यावेळी हाके यांनी मुख्यमंत्री झोपले आहेत. ते मीडिया बघत नाहीत, टीव्ही बघत नाहीत किंवा आंदोलन होत आहेत ते बघत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. लक्ष्मण हाके यांनी सांगितले की, आठव्या दिवसानंतर काल (19 जून) जिल्हाधिकारी येऊन गेले. शासन अजून कुठं आहे अशी विचारणा त्यांनी केली. हाके यांनी सांगितले की, मराठा समाजातील उपेक्षित घटक हा फक्त इकॉनॉमिकल मागास आहे. आरक्षण एक केवळ सामाजिक मागासांचा प्रतिनिधित्व करत आहे. मराठा समाजातील तरुणांना माझी विनंती आहे की शासनाकडून योजना घेऊ शकतात पॉलिसी घेऊ शकतात.