Nashik Crime : पंचवटी हादरली! 20 वर्षीय महिलेला शेतात नेऊन सामूहिक अत्याचार, अत्याचार करणारा नातेवाईकच
Nashik Crime News : पतीला जामिनदार मिळवून देण्याचे आमिष दाखवून तीन जणांनी एका 20 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पंचवटीत घडली आहे.
Nashik Crime News : पतीला जामिनदार मिळवून देण्याचे आमिष दाखवून तीन जणांनी एका 20 वर्षीय महिलेवर पंचवटी (Panchavati) परिसरातील रामवाडी येथील चौघुले पेट्रोल पंपामागील शेतातील मोकळ्या जागेत सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अत्याचार करणारा एक व्यक्ती महिलेचा नातेवाईक असल्याची माहिती पोलिसांनी (Nashik Police) दिली आहे. यामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी महिला व तिचा पती यांचे ती अल्पवयीन असतानाच प्रेमसंबंध होते. पीडितेच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून महिलेचा पती काही दिवसांपासून मुंबईला बलात्कार व पोस्कोच्या गुन्ह्यात अटकेत आहे.
20 वर्षीय महिलेला शेतात नेऊन सामूहिक अत्याचार
त्याला सोडविण्यासाठी जामिनदार मिळवून देतो, असे आमिष दाखवून पीडितेच्या दिराच्या व आणखी एकाच्या मदतीने संशयित अमित विजय दामले (25, रा. व्हाइट हाउसच्या मागे, मिशन मळा, शरणपूर रोड) पाने फिर्यादी महिलेबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. त्यावेळी अमितसोबत असणाऱ्या दोघांनी पीडितेचे हातपाय पकडून ठेवले होते. त्यांनी तिला मारहाण केली. हा प्रकार दि. 22 ते 23 जानेवारी दरम्यान चोपडा लॉन्स पुलाजवळ एका पेट्रोलपंपाच्या मागील शेतातील मोकळ्या जागेत घडला. याप्रकरणी प्रथम हा गुन्हा नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. नंतर तो पंचवटी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
दोघांना अटक, एक फरार
याप्रकरणी अमित विजय दामले व गोपाल राजेंद्र नागोलकर, (25, रा भंडारे यांचे किराणा दुकानाजवळ, बेथलेनगर, शरणपूर रोड) याला अटक करण्यात आली असून, दिराचा पोलीस शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील करीत आहेत.
अंबडला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
दरम्यान, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत लग्नाचे आमिष दाखवून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका 24 वर्षीय संशयिताने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित नितीन कदम (24) याने त्याच्या ओळखीची असलेल्या अल्पवयीन पीडित मुलीशी मैत्री करत मे 2024 ते नोव्हेंबर 2024 या दरम्यान लम्नाचे आमिष दाखवून तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम (पोस्को) नुसार संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा