एक्स्प्लोर

Baburao Chandere : अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना

Baburao Chandere : चांदेरे यांनी दोन दिवसांपूर्वीच एका बांधकाम व्यवसायिकाला रस्त्यावर उचलून आदळत अमानुष मारहाण केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी पहिल्यांदा टाळाटाळ झाली होती.

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Baburao Chandere) विश्वासू आणि पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे (Baburao Chandere) यांच्या दिवसाढवळ्या मोगलाईचा व्हिडिओ व्हायरल झाला असतानाच आता आणखी काही लोकांना दमदाटी करतानाचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. चांदेरे यांनी दोन दिवसांपूर्वीच एका बांधकाम व्यवसायिकाला रस्त्यावर उचलून आदळत अमानुष मारहाण केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी पहिल्यांदा टाळाटाळ झाली होती. मात्र, आता गुन्हा नोंद झाल्यावर देखील चांदेरेंना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे राजकीय वरदहस्त असल्याने चांदोरे मोकाट आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

काय आहे प्रकरण?

बाबुराव चांदेरे यांनी दोन दिवसांपूर्वी एका बांधकाम व्यावसायिकाला मारहाण केली होती. मारहाणीला दोन दिवस होऊनही पुणे पोलिसांनी कारवाई केली नव्हती. त्यानंतर दोन दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही.  दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून मनपा निवडणूक होत नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मध्यस्थीने बाबुराव चांदेरे यांनी 50 कोटींचा निधी आपल्या प्रभागात आणला होता. या कामासाठी ठेकेदारही त्यांच्याच मर्जीत नेमण्यात आला होता. यामधील एक ठेकेदार होता त्याच्याकडे ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम देण्यात आले होते. संबंधित ड्रेनेज लाईन बिल्डरच्या जागेतून जात होती, त्याच्यातून हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काम थांबलं तर ठेकेदाराला त्रास होईल म्हणून मारहाण करण्यात आली  होती. यापूर्वी सुद्धा बाबुराव चांदेरे यांचे अनेक व्हिडिओ मारहाणीचे व्हायरल झाले आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बाबूराव चांदेरे प्रकरणाची दखल 

दरम्यान, दिवसाढवळ्या मोगलाईची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बाबूराव चांदेरे प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे.  अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव वापरून कोणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही, असे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी म्हटले आहे. बाबुराव चांदेरे यांच्या याआधी देखील पक्षाकडे मारहाण आणि दहशत निर्माण करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.  कबड्डी असोसिएशनमधील मनमानी कारभाराचा देखील पक्षाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. प्रदेश पातळीवरून पुणे प्रकरणाची माहिती घेऊन त्यांच्यावर लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षातील वरिष्ठ नेत्याने एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baburao Chandere : अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना
अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
Guillain Barre Syndrome: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
Sharad Pawar Camp: सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, 'हा' बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर
सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, 'हा' बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akash Kanaujiya On Mumbai Police : पोलिसांच्या चुकीमुळं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, कनौजियाचा आरोपABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 27 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सVijay Wadettiwar : ... तर ST भाडेवाढ तात्काळ मागे घेत जनतेला दिलासा द्यावा९ सेकंदात बातमी Top 90 at 9AM Superfast 27 January 2025 सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baburao Chandere : अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना
अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
Guillain Barre Syndrome: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
Sharad Pawar Camp: सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, 'हा' बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर
सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, 'हा' बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
Pradosh Vrat 2025 : एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
Vijay Wadettiwar on ST Fair Hike : एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
Masik Shivratri 2025 : आज वर्षातील पहिल्या मासिक शिवरात्रीला करा 'हे' छोटे उपाय; क्षणात उघडेल निद्रीस्त भाग्य, सुख-संपत्तीत होईल अपार वाढ
आज वर्षातील पहिल्या मासिक शिवरात्रीला करा 'हे' छोटे उपाय; क्षणात उघडेल निद्रीस्त भाग्य, सुख-संपत्तीत होईल अपार वाढ
Embed widget