Baburao Chandere : बिल्डरला उचलून रस्त्यावर आदळले, तरी बाबुराव चांदेरेंना अटक करणं बंधनकारक नाही! पुणे पोलिसांकडून वाचवण्याचा प्रयत्न?
बाबुराव चांदेरे यांनी एका बांधकाम व्यवसायिकाला उचलून आपटल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असताना देखील पोलिसांनी मात्र चांदेरेंवर ढकलून दिल्याचा आणि मारहाण केल्याचा गुन्हा नोंद केला आाहे.
Baburao Chandere : बिल्डरला दिवसाढवळ्या उचलून आपटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Ajit Pawar) पुण्यातील अत्यंत निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांनी अजूनही बाबुराव चांदेरे यांना मोकाट सोडलं असून आतापर्यंत अटकेची कारवाई केलेली नाही. या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असून आता लावलेल्या कलमांवरूनही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून राजकीय वरदहस्त असल्याने बाबूराव चांदेरे यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी सुद्धा बाबुराव चांदेरे यांचे अनेक व्हिडिओ मारहाणीचे व्हायरल झाले आहेत.
बाबुराव चांदेरे यांना पुणे पोलिसांकडून वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत का?
त्यामुळे पुण्यातील अजित पवारांचे विश्वासू बाबुराव चांदेरे (Baburao Chandere) यांना पुणे पोलिसांकडून वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे. बाबुराव चांदेरे यांनी एका बांधकाम व्यवसायिकाला उचलून आपटल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असताना देखील पोलिसांनी मात्र चांदेरेंवर ढकलून दिल्याचा आणि मारहाण केल्याचा गुन्हा नोंद केला आाहे.
अटक करणं आम्हाला बंधनकारक नाही
कलम 324 अंतर्गत दाखल झालेल्या या गुन्ह्यासाठी सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असल्यानं चांडेरेंना अटक करणं आम्हाला बंधनकारक नाही अशी भूमिका पुणे पोलिसांनी घेतली आहे. बाबुराव चांदेरे हे पुणे महापालिकेचे पाचवेळा नगरसेवक राहिले आहेत. स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे. कोथरूड विधानसभेची निवडणूक देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली आहे. अजित पवारांचे ते अत्यंत विश्वासू मानले जातात. शनिवारी त्यांनी ठेकेदाराच्या कामात अडथळा आणणाऱ्या बिल्डरला उचलून आपटले होते. मात्र, तरीही त्यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माध्यमांनी या घटनेबाबत विचारले असता ते म्हणाले की, "आमचा पक्ष असा प्रकार सहन करणार नाही," चांदेरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो होऊ शकला नाही. संपर्क साधला आणि एका नातेवाईकाने सांगितले की ते कुठेतरी दूर गेले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या