पोलिसांना अर्वाच्य शिवीगाळ करणाऱ्या माजोरड्या बिल्डरला अद्दल घडली, कुणाल बाकलीवाल विरोधात छ. संभाजीनगरध्ये गुन्हा दाखल
kunal Bakliwal
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर शहरात डिफेंडर गाडी वापरणाऱ्या उर्मठ कुणाल बाकलीवालचे (Kunal Bakliwal) कारनामे उघड होत असून पोलिसांना कस्पटासमान लेखत अरेरावीने हुज्जत घालणाऱ्या माजोरड्या बिल्डरला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. तू मला ओळखले नाही का? बुढ्ढे तेरे को ड्युटी करनी आती है क्या.. असं म्हणत पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत सस्पेंड करण्याची धमकी देणाऱ्या कुणाला बाकलीवाल्वर छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
कुणाला बाकलीवालने नक्की काय केले?
छत्रपती संभाजीनगर शहरातील मिल कॉर्नर चौकात काळ्या चार चाकी डिफेंडर कारमध्ये कुणाला बाकलीवालने हॉर्न आणि सायरन वाजवून चारचाकी मुद्दाम रस्त्याच्या मधोमध उभी केली. पोलिसांनी थांबवल्यावर त्यांनाच शिवीगाळ करत 'साहेबांशी बोल' म्हणत फोन सरकवला. पोलिसांना 'गप्प बस' म्हणत दोन तासात तुम्हाला सस्पेंड करेन अशी धमकी दिली. दरम्यान एका बुलेट स्वारावर मॉडीफाय सायलेन्सर ची कायदेशीर कारवाई करत असताना कुणाल बाकलीवालने गाडीमध्ये घालत दरवाजा उघडून बुलेट स्वराच्या हातावर धक्का दिला. पोलिसांनी खाली उतरण्यास सांगितल्याचा एवढा राग कुणाला बाकलीवालला होता की जनतेच्या पैशातून पगार मिळतो पण तुम्ही जनतेलाच असं वागवता का असं म्हणत एका बड्या व्यक्तीचा फोन पोलिसांकडे दिला. अर्वाची शिवीगाळ केला. (Chhatrapati Sambhajinagar)
छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. हे लक्षात येऊनही त्याचा माज कमी झाला नाही. उलट बड्या व्यक्तीचा फोन पोलिसांना देत साहेबांशी बोला नाहीतर दोन तासात सस्पेंड करतो अशी धमकी त्याने दिली. पोलीस या सगळ्या प्रकारावर गप्प का होते असं सवाल उपस्थित झाल्यानंतर 24 तासात तपासाची चक्र फिरली. कुणाल बाकलीवाल्वर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पेशाने बिल्डर असणाऱ्या कुणाल बाकलीवालचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचे समोर आले. कुणाल डिफेंडर गाडी वापरत असल्याचेही समोर आल्यानंतर पोलिसांनी या उर्मट माजोरड्या कुणालला गुडघ्यावर बसवलं आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 132, 352, 351 (2) सह मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 100(2), 177, 119 (2) 177 प्रमाणे कायदेशीर फिर्यादी अंतर्गत पुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तनपुरे करत आहेत.
हेही वाचा: