एक्स्प्लोर
Arjun Khotkar : अर्जुन खोतकर 31 जुलै रोजी शिंदे गटात प्रवेश करणार? ABP Majha
शिवसेनेचे जालना जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर ३१ जुलै रोजी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं कळतंय. दिल्लीत एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यापासून खोतकर कधी प्रवेश करणार याची चर्चा सुरु होती. पण खोतकर यांनी मात्र ठोस निर्णय सांगितला नव्हता. आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात अर्जुन खोतकर यांचा प्रवेश होणार असल्याचं कळतंय. अर्जुन खोतकर आणि अब्दुल सत्तार आता थोड्याच वेळात दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत.
आणखी पाहा























