एक्स्प्लोर
Who is Raja Pateria : बेताल राजा पटेरिया नेमके कोण? ABP Majha
देश आणि देशातील संविधान वाचवायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येसाठी तयार रहायला हवं, असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री राजा पटेरिया यांनी केलं आहे.मध्यप्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील पवईमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राजा पटेरिया यांनी हे विधान केलंय. पटेरियांच्या या वक्तव्यावरून राजकीय वादंग पेटलं असून मध्यप्रदेश सरकारनं पटेरियांवर गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जारी करण्यात आलेत. त्यामुळं आता पटेरिया यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राजकीय वाद पेटलाय.
आणखी पाहा























