Sambhaji Nagar Robbery | संभाजीनगरमधील दरोड्यात कोट्यवधींचं घबाड, कोण लबाड?
Sambhaji Nagar Robbery | संभाजीनगरमधील दरोड्यात कोट्यवधींचं घबाड, कोण लबाड?
छत्रपती संभाजीनगमधले उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातल्या दरोड्यात नेमकं किती तोळं सोनं चोराला गेलं यावरून वाद पेटलाय...त्यातच आता लड्डा यांच्या घरात कोट्यवधींचं घबाड असल्याची टीप एका दरोडेखोराला मिळाली होती, अशी माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिलीय. तब्बल १० कोटींची ही रक्कम एका व्यवहारासाठी आणली होती, अशी कुणकूण चोरांना लागली. त्यासाठी दरोड्याचा प्लॅन आखलेल्या चोरांना घरात मात्र सोनं सापडलं...आणि त्याच्यावर त्यांनी डल्ला मारला...त्यातल्या साडे पाच किलोपैकी फक्त २० तोळे सोनं परत मिळाल्याचं लड्डा यांनी सांगितलंय. पण लड्डांच्या घरात साडे पाच किलो नाही तर साडे दहा किलो सोनं होतं, असा संशय सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलाय.























